Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : जागतिक सायकल स्पर्धेच्या नावाखाली रस्त्यांमध्ये ‘भ्रष्टाचार’ उघड? नसरापूर–वेल्हा–राजगड मार्गावरील निकृष्ट डांबरीकरणावर मोठे प्रश्नचिन्ह!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 16 December 2025, 11:42
Pune News

photo- ppn

Pune News : पुणे जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या जागतिक सायकल स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर नसरापूर–वेल्हा म्हणजेच राजगड तालुक्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर नव्याने डांबरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र या कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, रस्त्यांच्या कामाच्या नावाखाली भ्रष्टाचार तर होत नाही ना, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे? (Pune News)

 

या प्रकरणात मा. सरपंच असकवडी, भाऊ लक्ष्मण दसवडकर यांनी ठाम भूमिका घेत रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान असे निदर्शनास आले की रस्त्यावर केवळ खडी टाकून त्यावर अत्यल्प प्रमाणात डांबर टाकण्यात येत असून, हे काम केवळ वरवरचे व मलमपट्टी स्वरूपाचे असल्याचा आरोप करण्यात आला आहे. वरून रस्ता गुळगुळीत दिसावा यासाठी रोलर फिरवून काम पूर्ण केल्याचा आभास निर्माण केला जात आहे?

करंजवणे गावाच्या हद्दीत तर कामाचा दर्जा अधिकच धक्कादायक असल्याचे समोर आले आहे. येथे जुन्या रस्त्यावरील खराब डांबर, माती किंवा धूळ काढण्यात न येता त्याच जुन्या रस्त्यावर थेट खडी टाकून त्यावर पुन्हा डांबर व डस्ट टाकण्यात येत असल्याचे पाहण्यात आले आहे. नियमानुसार जुना रस्ता पूर्णपणे स्क्रॅप करून स्वच्छ करणे आवश्यक असताना तसे न करता काम सुरू असल्याने हा रस्ता येणारा एक पावसाळाही काढू शकणार नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे?

या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ पुरावा मा. सरपंच भाऊ लक्ष्मण दसवडकर यांनी तयार केला असून त्यामध्ये रस्त्याच्या कामातील निकृष्ट दर्जा स्पष्टपणे दिसून येतो. जागतिक दर्जाच्या सायकल स्पर्धेसाठी रस्ता तयार केला जात असताना अशा प्रकारे दर्जाहीन काम का केले जात आहे, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे?

इतक्या उघडपणे निकृष्ट काम सुरू असतानाही संबंधित प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग व स्थानिक यंत्रणांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कामाची पाहणी नेमकी कोण करत आहे? दर्जा तपासणी अहवाल कुठे आहे? आणि जर नियमबाह्य काम होत असेल तर त्यावर कारवाई का होत नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत?

जागतिक सायकल स्पर्धेच्या नावाखाली सायकल ट्रॅक व रस्त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार होत आहे का, असा संशय आता बळावत आहे. सार्वजनिक निधीतून होणाऱ्या या कामात पारदर्शकता राहणार आहे का, की स्पर्धेच्या घाईत सर्व नियमांना बगल दिली जात आहे, हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे?

या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून निकृष्ट काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी व दर्जेदार रस्ता तयार करावा, अशी ठाम मागणी मा. सरपंच असकवडी भाऊ लक्ष्मण दसवडकर व स्थानिक नागरिकांकडून होत आहे. प्रशासन या गंभीर आरोपांची दखल घेणार का, की सायकल स्पर्धेच्या नावाखाली सुरू असलेला हा कथित भ्रष्टाचार दुर्लक्षित राहणार आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे?

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

भिगवणमध्ये सुसज्ज क्रीडांगणाचा अभाव; तरुणाईचा संताप, उपाययोजनांची मागणी तीव्र

Saturday, 4 April 2026, 18:18
baramati

Baramati : बारामतीत अखेर ‘मैदान’ मारणार कोण? बिनविरोधची चर्चा हवेत विरली; काय म्हणाले जय पवार ?

Saturday, 4 April 2026, 18:08

शिरूर-चौफुला महामार्गावर आंबळेत भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, ट्रकचालक फरार….

Saturday, 4 April 2026, 18:08
"I won't leave you alive today" The husband's head was pounding after seeing his wife's Instagram chat; the ghost of doubt entered his head and he immediately put on a four-wheeler...

“तुला आज जिवंत सोडणार नाही” बायकोची इंस्टाग्राम चॅट पाहून नवऱ्याचं डोकं सटकलं; संशयाचं भूत डोक्यात घुसलं अन् सरळ चारचाकी अंगावर घालत…

Saturday, 4 April 2026, 17:56
Crime

Crime : मदतीसाठी ओरडणारी आई आणि रडणारी मुलगी; मामाच्या मुलानेच नात्याला लावला काळिमा; दुचाकीवर बसवून थेट…

Saturday, 4 April 2026, 17:44

पुणेकर चाहत्यांचा हिरमोड! अवकाळी पावसाचा “यो यो हनी सिंह”च्या शोला फटका; 4 एप्रिलचा कॉन्सर्ट आता “या” तारखेला होणार

Saturday, 4 April 2026, 17:11
Next Post
Pimpri-Chinchwad Election

Pimpri-Chinchwad Election : महाराष्ट्राच्या राजकारणात 'ट्विस्ट'! मतविभागणी टाळण्यासाठी सुप्रिया सुळे सक्रिय;काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.