Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बाप्पाच्या उत्सवात पुणे मेट्रो सज्ज!24 तास धावणार मेट्रो; वेळापत्रक जाहीर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 9 September 2026, 19:07

पुणे : गणेशोत्सवाच्या काळात पुण्यातील भाविकांचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीस्कर व्हावा यासाठी पुणे मेट्रो प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. या काळात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मेट्रोच्या वेळा वाढवण्यात आल्या असून, गर्दीच्या वेळेत दर 5 मिनिटांनी मेट्रो गाड्या उपलब्ध असतील.

मेट्रोच्या वेळापत्रकातील बदल

14 ते 16 सप्टेंबर (गणेश चतुर्थी ते बुधवार): सकाळी 6:00 ते रात्री 11:00 या नियमित वेळेत मेट्रो धावेल.

17 ते 24 सप्टेंबर (गौरी पूजन आणि पुढील दिवस): भाविकांच्या सोयीसाठी मेट्रो सकाळी 6:00 ते मध्यरात्री 2:00 वाजेपर्यंत सुरू राहील.

 

25 ते 26 सप्टेंबर (अनंत चतुर्दशी): उत्सवाच्या मुख्य दिवशी 25 सप्टेंबर रोजी सकाळी 6:00 वाजल्यापासून ते सलग 26 सप्टेंबरच्या रात्री 11:00 वाजेपर्यंत (एकूण 41 तास) मेट्रो अखंडपणे धावेल.

27 सप्टेंबरपासून: मेट्रोची सेवा पूर्ववत होऊन नेहमीप्रमाणे सकाळी 6:00 ते रात्री 11:00 अशी सुरू राहील.

मध्यवर्ती पुण्यातील पेठ भागात गणपती दर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी स्थानकांची विशेष वाटप व्यवस्था करण्यात आली आहे:
त्यानुसार मार्गिका 1 वरील प्रवाशांनी: कसबा पेठ स्थानकावर उतरावे.मार्गिका 2 वरील प्रवाशांनी: वनाजकडून येणाऱ्यांनी डेक्कन जिमखाना स्थानकाचा, तर रामवाडीकडून येणाऱ्यांनी PMC (पुणे महानगरपालिका) स्थानकाचा वापर करावा.

महात्मा फुले मंडई स्थानक: दर्शनासाठी येथे उतरून गर्दी करणे टाळावे; हे स्थानक मुख्यत्वे फक्त परतीच्या प्रवासासाठी वापरावे. 14 ते 26 सप्टेंबर या कालावधीत हे स्थानक ‘एकदिशात्मक’असेल. लोकमान्य टिळक पुतळ्याकडील प्रवेशद्वार क्र. 3 फक्त आत जाण्यासाठी, तर छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील द्वार क्र. 2 फक्त बाहेर पडण्यासाठी खुले राहील.

याशिवाय, जिल्हा न्यायालय स्थानकात मार्ग बदलावा.नागरिकांनी आपापल्या मार्गावरील नमूद स्थानकांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट! पार्थ पवार यांना आरोपी का केलं नाही? हायकोर्टाचा मोठा सवाल

Wednesday, 9 September 2026, 19:52

बाप्पाच्या उत्सवात पुणे मेट्रो सज्ज!24 तास धावणार मेट्रो; वेळापत्रक जाहीर

Wednesday, 9 September 2026, 19:07

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अष्टापूरला मानाचा ‘अध्यक्ष चषक’! पुणे जिल्ह्यात पटकवला तृतीय क्रमांक; शैक्षणिक गुणवत्ता अन् लोकसहभागातून शाळेने रचला इतिहास

Wednesday, 9 September 2026, 19:04

कोल्हापूर ‘गोकुळ’ निवडणुकीचा बिगुल वाजला; ५,३३१ मतदार बजावणार अधिकार, १८ ऑक्टोबरला मतदान

Wednesday, 9 September 2026, 18:58

कवडीपाट टोलनाक्यावर तरुणीचा विनयभंग; दोन सख्ख्या भावांविरोधात गुन्हा दाखल

Wednesday, 9 September 2026, 18:15

पुण्यात आयटीच्या विद्यार्थ्याचा खतरनाक प्रताप! PMPML च्या अधिकृत ॲपचे हुबेहूब बनावट व्हर्जन बनवून महिनाभर फुकट प्रवास

Wednesday, 9 September 2026, 18:12
Next Post

मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट! पार्थ पवार यांना आरोपी का केलं नाही? हायकोर्टाचा मोठा सवाल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp