Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune-Kolhapur Highway: पुणे-कोल्हापूर महामार्गासाठी गडकरींची मोठी घोषणा! 6000 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 7 December 2025, 15:11
Pune-Kolhapur Highway: Gadkari's big announcement for Pune-Kolhapur Highway! Approval for a project worth Rs 6000 crore

पुणे: लोकसभेत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Pune-Kolhapur Highway) यांनी पुणे-कोल्हापूर महामार्गाबाबत (Nitin Gadakari) महत्त्वाची घोषणा केली आहे. या महामार्गाच्या सुधारणा आणि विस्तारासाठी सुमारे 6000 कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून, लवकरच या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Pune News)

 

हिवाळी अधिवेशनात बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले की, मंत्रालय डीपीआर अंमलात आणण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. या प्रकल्पांतर्गत पुणे ते सातारा आणि पुढे कोल्हापूरपर्यंतच्या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यात येणार आहेत. विशेषतः खंबाटकी घाट परिसरात दोन नवीन बोगदे तयार करण्यात येत असून, यापैकी एका बोगद्याचे उद्घाटन लवकरच करण्यात येणार आहे.

गडकरी यांनी या महामार्गाचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित केले. पश्चिम बायपासवरील सेवा रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, सातारा ते कोल्हापूर दरम्यानच्या कामांना आधीच मंजुरी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि खासदारांनी दिलेल्या सूचनांवर चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात मंत्रालयात बैठक घेण्यात येणार आहे.

पुणे ते बेंगळुरू मार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांचे हाल कमी करण्यासाठी महामार्गाच्या पृष्ठभागाची दुरुस्ती, काँक्रिटीकरण आणि इतर सुधारणा कामे एका वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही गडकरी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी या प्रकल्पात होत असलेल्या विलंबावर नाराजी व्यक्त केली. काही कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले असताना कामाला वारंवार उशीर का होत आहे, असा सवाल त्यांनी केला. नवले पूल परिसर, कात्रज, शिंदेवाडी, खेड शिवापूर आणि कापूरहोळ येथे होणारी वाहतूक कोंडी आणि वाढते अपघात याकडेही त्यांनी लक्ष वेधले. रात्रीच्या वेळेस परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून होत आहेत. अशा पार्श्वभूमीवर गडकरी यांनी पुणे-कोल्हापूर महामार्गाचे काम एका वर्षात पूर्ण केले जाईल, असा दावा केला आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांनो लक्ष द्या! खत खरेदीचे नियम बदलले; आता ‘हा’ आयडी नसेल तर रिकाम्या हाती परतावे लागणार

Thursday, 2 April 2026, 10:05

गावी निघालेल्या पत्नीच्या बसचा पाठलाग ठरला जीवघेणा; कोरेगाव मूळ येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 9:57

सराईत ‘राठ्या’च्या खिशात हात घातला अन् पोलीसही हादरले! मुलीला शोधताना समोर आलं पुण्यातील मोठं रॅकेट

Thursday, 2 April 2026, 9:22

शेतकऱ्यांसमोर सरकार झुकले! ‘शक्तिपीठ महामार्गा’चा नकाशा बदलला; जाणून घ्या अधिक माहिती

Thursday, 2 April 2026, 8:47

पुण्यात मोठ्या रक्तपाताचा कट? ‘ती’ कार सुसाट होती, पोलिसांनी थांबवली गाडी अन् समोर जे आलं ते पाहून सगळेच थक्क!

Thursday, 2 April 2026, 8:33

इराण गुडघ्यावर! हॉर्मुझची कोंडी आणि अमेरिकेचा मोठा विजय; ट्रम्प यांनी केली ऐतिहासिक घोषणा

Thursday, 2 April 2026, 8:15
Next Post
Crime News: Shocking! 'I will increase your practical marks only with me once' Teacher's disgusting act with student; Called to lodge and...

Crime News: धक्कादायक! 'तुला प्रॅक्टिकलचे मार्क वाढवून देतो फक्त माझ्यासोबत एकदा' शिक्षकाचं विद्यार्थिनीसोबत घृणास्पद कृत्य; लॉजवर बोलावलं अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.