पुणे: लग्नानंतरच पती नपुंसक (Pune Crime) असल्याचे समोर आल्यानंतर एका (Pune News) विवाहित युवतीने दिलेल्या तक्रारीवरून समर्थ पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या सहाजणांविरोधात फसवणूक, धमकी देणे आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगा नपुंसक असल्याची माहिती आधीपासून असूनही ती जाणीवपूर्वक लपवून ठेवत लग्न लावून दिल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. (Breaking News)

कोणाला सांगितलं तर…
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणीचे वय 23 वर्षे असून तिचे लग्न 18 एप्रिल 2025 रोजी झाले. लग्नानंतर काहीच दिवसांत पती नपुंसक असल्याचे तिला लक्षात आले. त्याबाबत स्पष्टीकरण मागण्यासाठी तिने पती आणि सासरच्या मंडळींशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिच्याच नावाने आरोप केले जातील आणि याबाबत कुणाला सांगितल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशा धमक्या देण्यात आल्याचे तिने सांगितले आहे. (Marathi News)
सतत मानसिक छळ
तक्रारीत असेही नमूद करण्यात आले आहे की सासरच्या मंडळींनी तिचे इतर व्यक्तीसोबत संबंध असल्याचा खोटा आरोप करून तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. शिवाय, लग्नातील मानपान, वागणूक आणि किरकोळ कारणांवरून तिच्यावर सतत मानसिक छळ केला जात होता. या सर्व प्रकारामुळे ती मोठ्या तणावात राहत होती, असेही तक्रारीत म्हटले आहे.
सत्य लपवून ठेवत फसवणूक
तक्रारदार युवतीने पुढे असा आरोप केला आहे की पती नपुंसक असल्याचे माहिती असूनही हे सत्य लपवून ठेवत तिची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी पती, सासू, सासरे, ननंद, ननंदेचा पती आणि चुलत सासरा अशा सहाजणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. समर्थ पोलीस ठाण्याचे पथक या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत असून संबंधितांची चौकशी सुरू आहे.







