अमित मुंडीक

पुणे: दोन अल्पवयीन मुलींना फुस (Pune Crime) लावून राजस्थानमध्ये घेऊन (Pune News) गेलेल्या दोन आरोपींना काळेपडळ पोलिसांनी अटक केली आहे. काळेपडळ पोलीस ठाण्यात बीएनएस व पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद असून, मोबाईल क्रमांकांच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी ३३०० किमीचा मोठा प्रवास करत गुजरात व राजस्थानमधील अनेक ठिकाणी शोधमोहीम चालवली.
या मोहिमेत राणी व पाली (राजस्थान) येथे दोन्ही अल्पवयीन मुली सुरक्षित सापडल्या, तर आरोपी सुरेशकुमार वडदाराम प्रजापती (२१) व सुरेशकुमार मोहनलाल राणाभील (३१) यांना ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली व विविध पथकांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली. पोलिसांच्या तत्पर आणि समन्वित कामगिरीचे सर्व स्तरांवर कौतुक होत आहे.







