Thursday, August 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सुट्टीवरून परतताच प्रेग्नन्सी टेस्ट? पुण्यातील आदिवासी वसतिगृहात विद्यार्थिनींचा धक्कादायक दावा!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 26 August 2026, 14:35

पुणे : पुण्यातील मांजरी परिसरातील शासकीय आदिवासी वसतिगृहात मूलभूत सुविधांचा अभाव, अस्वच्छ परिसर आणि सुरक्षेच्या प्रश्नांवरून गेल्या 14 दिवसांपासून विद्यार्थी-विद्यार्थिनींचे आंदोलन सुरू आहे. प्रशासनाच्या कारभारावर प्रचंड संताप व्यक्त करत, शिक्षणासाठी दूर आलेल्या या मुलींना सुरक्षित आणि चांगल्या सुविधा मिळाव्यात, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

या आंदोलना दरम्यान विद्यार्थिनींनी एक गंभीर आरोप केला आहे. वसतिगृहात प्रवेश देताना मुलींची गर्भावस्था चाचणी केली जाते, असा दावा त्यांनी केला आहे. यावर्षी देखील अशा प्रकारची तपासणी झाली असून, त्याचे रिपोर्ट मात्र मुलींना दाखवले गेले नाहीत. यासंदर्भात कोणताही लेखी पुरावा हातात नसला, तरीही असा प्रकार पूर्वी घडल्याचा ठाम दावा विद्यार्थिनींनी केला आहे. “आम्ही कोणतेही राजकारण करत नसून केवळ आमचे हक्क मागत आहोत. आजच्या आज मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र रास्ता रोको करू,” असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.

दुसऱ्या बाजूला, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दीर्घ रजेवरून परतणाऱ्या विद्यार्थ्यांकडून केवळ आरोग्याचे ‘फिटनेस प्रमाणपत्र’ घेतले जाते, कोणतीही गर्भाशयाची किंवा प्रेग्नन्सी चाचणी केली जात नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

मात्र, यापूर्वी सप्टेंबर 2025 मध्ये पुण्यातील वाकड येथील आदिवासी वसतिगृहात अशाच प्रकारच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन चौकशीचे आणि दोषींवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यामुळे सध्याच्या प्रकरणाचीही निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करून विद्यार्थिनींना न्याय द्यावा, ही मागणी आता अधिक तीव्र झाली आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नेपाळमध्ये साताऱ्याच्या 10 महिला पर्यटक सुरक्षित; प्रशासनाच्या संपर्कात, पोखरातील हॉटेलमध्ये मुक्काम

Thursday, 27 August 2026, 11:49

‘आज तुझा गेम वाजवून टाकणार!’ म्हणत तरुणाला अडवले; धारदार हत्याराने हल्ल्याचा प्रयत्न, मांजरीत टोळक्यावर गुन्हा दाखल

Thursday, 27 August 2026, 11:10

कामाच्या ठिकाणी काळाचा कहर! पिंपरी-चिंचवडमध्ये दोन कामगारांचा दुर्दैवी अंत,परिसरात हळहळ

Thursday, 27 August 2026, 10:51

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या; एक जिवंत काडतूस जप्त

Thursday, 27 August 2026, 9:44

केतन अग्रवाल हत्याकांडातील सिया गोयलला तुरुंगात VIP ट्रीटमेंट?; रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाच्या आरोपांनी खळबळ, चौकशीची मागणी

Thursday, 27 August 2026, 9:35

ऑनलाइन मैत्री ठरली जीवघेणी!पुण्यातील तरुणीला डांबून ठेवून अत्याचार; देहविक्रीच्या दलदलीत ढकलल्याचा आरोप

Thursday, 27 August 2026, 9:01
Next Post

“कुणालला नेमकं काय हवं होतं?” खवड्या डोंगर प्रकरणात 5 दिवसांनी बहिणीचा धक्कादायक दावा, सांगितलं सत्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp