Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

CJP कार्यकर्त्यांवर पोलिसांची कारवाई! आशुतोष रांकासह कार्यकर्ते ताब्यात, अभिजीत दीपकेंचा सरकारला थेट सवाल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 27 September 2026, 14:54

पुणे : राजधानी दिल्लीतील जतंरमंतरवरील आंदोलनाच्या यशानंतर कॉकरोच जनता पार्टीने विविध मुद्यावरून आंदोलन छेडले आहे.मात्र आता आसाममधील गुवाहाटी येथे ‘सिटीझन्स फॉर जस्टिस अँड पीस’ (CJP) या संघटनेचे सह -संयोजक आशुतोष रांका यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईनंतर संघटनेचे संस्थापक अभिजित दीपके यांनी प्रशासनावर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुवाहाटी येथे आयोजित केलेली CJP ची पहिली प्रादेशिक स्वयंसेवक सभा सुरू होण्याआधीच पोलिसांनी उधळून लावली. या घटनेदरम्यान पोलिसांनी CJP चे सह-संयोजक आशुतोष रांका यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नेत्यांना ताब्यात घेतले. यावरून अभिजित दीपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत आरोप केला की, पोलीस पथकाने आशुतोष रांका आणि त्यांच्या सहकाऱ्यांना एका गुप्त ठिकाणी हलवले आहे. या बैठकीसाठी आलेल्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी सभेच्या ठिकाणी जाणारे सर्व रस्ते बंद केले होते. एवढेच नाही तर घटनास्थळी अश्रुधुराचे साहित्य तैनात करण्यात आले होते आणि पकडलेल्या कार्यकर्त्यांना भेटण्यापासून वकिलांनाही रोखण्यात आले.

शनिवारपासून आसाम दौऱ्यावर असलेले आशुतोष रांका या बैठकीत मार्गदर्शन करणार होते. या दौऱ्यादरम्यान CJP ची टीम मतदार यादी पुनर्रचना प्रक्रियेमुळे अडचणीत आलेल्या कुटुंबांना भेटणार होती. तसेच स्थानिक शासकीय शाळांची पाहणी करून जमिनीशी संबंधित प्रश्नांवर अभ्यास करणार होती. रांका यांनी असा आरोप केला आहे की, मतदार यादीतील फेरफार आणि इतर प्रशासकीय त्रुटी उघड होऊ नयेत, म्हणूनच राज्य प्रशासन त्यांच्या कामात अडथळे आणत आहे.

या पोलीस कारवाईनंतरही CJP ने आसामसह संपूर्ण ईशान्य भारतात आपले नेटवर्क विस्तारण्याचा आणि तळागाळातील लोकांचे प्रश्न मांडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सध्या ताब्यात घेतलेल्या सर्व सदस्यांची तात्काळ मुक्तता करण्याची मागणी संघटनेकडून केली जात आहे, मात्र किती लोकांना आणि कुठे ठेवले आहे याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अभिजीत दीपकेंच्या ‘गुरु’चं गूढ उलगडलं! सगळ्या प्लॅनिंगमागे कोण? महाराष्ट्र कनेक्शन चर्चेत

Sunday, 27 September 2026, 15:30

मुंबईत दुर्घटना ! सार्वजनिक शौचालयातील केमिकल गळती ठरली जीवघेणी; 2 तरुणांचा मृत्यू

Sunday, 27 September 2026, 15:10

CJP कार्यकर्त्यांवर पोलिसांची कारवाई! आशुतोष रांकासह कार्यकर्ते ताब्यात, अभिजीत दीपकेंचा सरकारला थेट सवाल

Sunday, 27 September 2026, 14:54

घरातून निघाले अन् दोन दिवसांनी धक्कादायक बातमी आली! निगडीत आढळला पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह; नेमकं काय घडलं? वाचा

Sunday, 27 September 2026, 14:53

विरोधकांनी अडचणी आणल्या नसत्या तर यशवंत कारखाना यंदा सुरू झाला असता; सुभाष जगताप

Sunday, 27 September 2026, 14:31

निमगाव केतकीतील दुचाकी चोरीचा पर्दाफाश; 1.50 लाखांचा मुद्देमाल जप्त

Sunday, 27 September 2026, 14:24
Next Post

मुंबईत दुर्घटना ! सार्वजनिक शौचालयातील केमिकल गळती ठरली जीवघेणी; 2 तरुणांचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp