पुणे: मुंढवा येथील जमीन गैरव्यवहार (Parth Pawar Land Scam) प्रकरणाला आता नवा (Jay Pawar Marriage) कलाटणी मिळत असून या प्रकरणातील संशय अधिक गडद होत चालल्याची माहिती समोर येत आहे. अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या विरोधात तपास अधिक वेगाने पुढे सरकत असल्याचे संकेत मिळाले आहेत. (Pune News)

पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वी दिग्विजय पाटील यांना चौकशीची नोटीस पाठवली होती. त्यानुसार ते 2 डिसेंबर रोजी पुणे पोलीस आयुक्तालयात हजर झाले. ईओडब्ल्यू अधिकाऱ्यांनी त्यांची अनेक मुद्द्यांवर सविस्तर चौकशी केली. चौकशीदरम्यान पाटील यांनी, गरज भासल्यास पुन्हा उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले. तसेच ते जय पवार यांच्या परदेशातील लग्नसमारंभासाठी जाणार असल्याचेही त्यांनी सांगितल्याची माहिती आहे.
दुसरीकडे, बहरीनमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या लग्नाची तयारी सुरू आहे. या सोहळ्यास दिग्विजय पाटील उपस्थित राहू शकतात, अशी चर्चा आहे. मात्र त्यांच्या विरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवलेला असल्याने चौकशीची प्रक्रिया आता अधिक वेग घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणात आधीच शीतल तेजवानी हिला अटक झाली आहे. तिच्या चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार पार्थ पवार यांच्या अडचणी वाढू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. अमेडिया नावाच्या कंपनीमध्ये 99 टक्के भागभांडवल पार्थ पवार यांच्या नावावर असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत या प्रकरणाचा तपास आणखी गती घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंढवा जमीन प्रकरणामुळे पवार परिवारातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत, आणि या प्रकरणातील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागून आहे.







