Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन येथील कस्तुरी प्रतिष्ठानचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न, हजारो वऱ्हाडींच्या उपस्थितीत ६ जोडपे विवाहबद्ध …! 

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 8 December 2022, 10:17

हनुमंत चिकणे

उरुळी कांचन : दरवर्षीप्रमाणे यंदाही उरुळी कांचन (ता. हवेली) येथील कस्तुरी प्रतिष्ठानच्या वतीने गरजुंसाठी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर बुधवारी (ता. ०७) मोठ्या उत्साहात पार पडला. या विवाह सोहळ्यात ६ जोडप्यांचे विवाह पार पडले असून वधुवरांना लग्नाचा पोशाख, जीवनावश्यक संसारोपयोगी भांडी, बूट, चप्पल व सर्वांच्या भोजनाची व्यवस्था प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली होती.

उरुळी कांचन (ता. हवेली) येथील कस्तुरी मंगल कार्यालय या ठिकाणी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामुदायिक विवाह सोहळा विविध स्तरातील मान्यवरांच्या साक्षीने व हजारो नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. वधू-वरांची मिरवणूक वाजत – गाजत काढण्यात आली. कोणता धर्म, जात नाही तर केवळ आयुष्यभर एकमेकांना साथ देण्यासाठी सात फेरे घेत दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर बुधवारी ६ जोडप्यांनी रेशीमगाठी बांधल्या.

 

लग्न सोहळ्यात उपस्थित असलेल्या वधू वरांच्या नातेवाइकांना व उपस्थित असलेल्या नागरिकांना स्वादिष्ट भोजन देण्यात आले. या विवाह सोहळ्यातील वधुवरांना लग्नाचा पोशाख, जीवनावश्यक संसारोपयोगी भांडी, बूट, चप्पल व सर्वांच्या भोजनाची व्यवस्था प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली होती.

यंदाचे हे सामुदायिक विवाह सोहळ्याचे १२ वे वर्ष आहे. शेतकऱ्यांनी मुलामुलींच्या लग्नासाठी कर्ज काढू नये आणि बँका, पतसंस्था किंवा सावकारांच्या कठोर वसुलीस त्यांना तोंड द्यावे लागू नये, म्हणून नैतिक जबाबदारी स्विकारत विवाह सोहळ्यास सुरुवात कस्तुरी प्रतिष्ठानतर्फे केली होती. विवाहात सहभागी नवदांपत्यास मणी मंगळसूत्र, नवरदेवाचा सफारी, संसारोपयोगी भांडी, बूट व चप्पल देण्यात आली.

दरम्यान, यावेळी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचारी आरती खलचे यांना उरुळी कांचन येथील रहदारी नियंत्रण व्यवस्था उत्तम प्रकारे बजावत असल्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कस्तुरी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संतोष भन्साळी, सचिव शंकर पाटील, खजिनदार महादेव रेवडकर, सदस्य घनश्याम मेमाने, ऋषिकेश जगताप, महेश कुंकूलोक, कौस्तुभ मेमाणे, गणेश उंबरकर, दत्तात्रय मदने, खेमचंद पुरुषवाणी बापूसाहेब लाड व हजारो वऱ्हाडी उपस्थित होते.

याबाबत बोलताना कस्तुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाने म्हणाले, “गरिबांची लग्न झाली पाहिजे सर्वसामान्य नागरिक हा कर्जबाजारी झाला नाही पाहिजे. जास्त लग्न झाल्याने खर्चहि कमी येतो. गरिबांनी या अशा विवाह सोहळ्यात सहभागी होऊन लग्न केली पाहिजेत. कस्तुरी प्रतिष्ठानचे पहिल्यापासूनच ब्रीदवाक्य आहे. प्रार्थना करणाऱ्या ओढांपेक्षा मदत करणारे हात पवित्र असतात जेवढे आपल्या हाताने करता येते तेवढे आपण केले आहे.”

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17

शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार! राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

Friday, 3 July 2026, 15:13

“तुमच्या कुत्र्याने परत घाण केली” पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी…

Friday, 3 July 2026, 15:00

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30
Next Post

अभिजितदादा कदम, रुद्रप्रताप, जयनाथ मंडळ, बाणेर युवा संघाची आगेकूच...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.