Tuesday, February 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील पांडवकालीन महादेव मंदीरात “नागराज” अवतरले, ते आले, त्यांनी पाहिले व त्यांनी थेट महादेवाच्या पिंडीला वेटोळे घालुन भाविकांना दर्शनही दिले…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 6 August 2022, 10:57

लोणी काळभोर (पुणे) : महादेवांच्या पिंडीवर नागराज वेटोळे घालुन बसलेले दृष्य आपण अनेक वेळा हिंदी अथवा मराठी चित्रपटात पाहिलेले असेल, पण लोणी काळभोरच्या शेकडो शिवभक्तांना मात्र हा नजारा याची देही- याची डोळा पाहायला मिळाला. शुक्रवारी (ता.०५ ) दुपारी लोणी काळभोर येथील पांडवकालीन महादेव मंदीरात अचानक “नागराज” अवतरले, व त्यांनी थेट महादेवाच्या पिंडीला वेटोळे घालुन मंदीरात येणाऱ्या शेकडो भाविकांना दर्शनही दिले.

भगवान महादेव व नागराज यांचे नाते काय आहे हे आपण हिंदी-मराठी चित्रपटात पहाण्याबरोबरच अनेक कथा-कांदबंऱ्यात वाचत आलो आहोत. याबाबत अनेक कथाकांदबऱ्यात तर भऱभरुन लिहलेही गेले आहे. मात्र हे प्रत्यक्ष पहाण्याचे भाग्य आत्तापर्यंत फारच थोड्या लोकांना लाभले आहे. यात लोणी काळभोर येथील शिवभक्तांचाही नंबर लागला आहे. शुक्रवारी दुपारी दोन वाजनेच्या सुमारास लोणी काळभोर येथील पांडवकालीन महादेव मंदीराचे विश्वस्त सुरेश पर्वतराव काळभोर यांना ते भाग्य सर्वप्रथम लाभले. त्यांनी ही बाब मंदीरात येणाऱ्या भाविकांना दाखवली. त्यानंतर शेकडो भविकांनी नागराजांचे दर्शन घेतले.

लोणी काळभोर इथलं हे शिवालय पांडवकालीन असल्याचं बोललं जातं. सुमारे 50 वर्षांपूर्वी या मंदिराच्या आसपासच्या जागेची परिश्रमपूर्वक स्वच्छता आणि कायापालट करून मंदिराला प्रकाश झोतात आणण्याचं काम श्री सुरेश पर्वतराव काळभोर ऊर्फ महाराज यांनी केलं. आजूबाजूच्या वृक्षांच्या लागवडीमुळे मंदिर परिसर प्रेक्षणिय आहे. या मंदिरातलं शिवलिंग, हे पांडवकालीन आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याच्या दारात , लक्ष्मी नारायणाची त्या काळात कोरलेली मूर्ती, हे या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणता येईल. जीर्णोद्धाराच्या वेळी स्थापित केलेली नंदीची मूर्तीही , अखंडपणे एका दगडातून, कोरीव कामाने बनवलेली आहे. मंदिरासमोर सतत अग्नि पेटता ठेवलेला असतो. अशा वातावरणात नागराजाने भाविकांना दर्शन दिल्याने, लोणीकाळभोर परीसरात भावीकांत मंदीराबाबत श्रध्दा आनखीनच वाढली. हा व्हीडीओ अनेकांनी आपल्या सोशल मिडीयामधुन व्हायरलही केल्याचे दिसुन आले.

याबाबत अधिक माहिती देतांना हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी काळभोर म्हणाले, लोणी काळभोर येथील महादेवाचे मंदीर पांडवकालीन आहे. या मंदीरात हजारो भाविक रोज दर्शनाला येत असतात. त्यातच काल (शुक्रवारी) दुपारी दोन वाजनेच्या सुमारास नागराजाने थेट महादेवाच्या पिंडीला वेटोळे घालुन, नागराजांचे भाविकांना दर्शन दिले. नागराज मंदीरात तासभर बसुन होते. त्यांनी मंदीराचे विश्वस्त सुरेश काळभोर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या जवळ जाऊनही, त्यांना दर्शन देण्याचा प्रयत्न केला. तब्बल तासभरानंतर गावातील सर्पमित्रांनी नागराजांना पकडुन, शेजारीत झाडात सोडुन दिले. वरील प्रकरणामुळे आमची श्रध्दा आनखीनच वाढली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Pune Accident: कात्रज-नवले पूल परिसरात भीषण अपघात; ट्रकची बसला जोरदार धडक, चालकाचा जागीच मृत्यू

Tuesday, 24 February 2026, 9:33

Pune News: पोलीस आले, पळा…! पुण्यात स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; घाबरलेल्या तरुणीची खिडकीतून उडी अन् जागीच मृत्यू

Tuesday, 24 February 2026, 9:14

Pune News: पुणेकरांनो लक्ष द्या! पंडित प्रदीप मिश्रांच्या कथेनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; ‘हे’ मार्ग राहतील बंद

Tuesday, 24 February 2026, 8:52

एअर अ‍ॅम्ब्युलन्स कोसळून रुग्ण आणि डॉक्टरांसह 7 जणांचा मृत्यू; नेमकं काय घडलं? वाचा

Tuesday, 24 February 2026, 7:50

Pune Weather: पुण्यात पहाटे गारवा अन् दुपारी उन्हाचे चटके; कसे असेल आजचे हवामान? जाणून घ्या

Tuesday, 24 February 2026, 7:34

Daily Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस? वाचा, आजचे राशीभविष्य

Tuesday, 24 February 2026, 7:26
Next Post
recruitment in maha pareshan company maha government

रेल्वेत एक लाख जणांना नोकरीची संधी : RRB GROUP D परिक्षेची तारीख जाहीर...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.