Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नागपूर हादरलं: अवघ्या ३५ दिवसांच्या नवविवाहितेचा हुंडाबळी, सासरच्या जाचाला कंटाळून गळफास

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 4 June 2025, 15:00

नागपूर:  राज्यभरात वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे हुंडाबळीच्या घटनांवर पुन्हा एकदा संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच, नागपूरमध्ये आणखी एका नवविवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आयुष्य संपवल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. नागपूरच्या बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी मयुरी ठाकरे डाहुले हिने लग्नानंतर अवघ्या ३५ दिवसांत आत्महत्या केली आहे.

२५ एप्रिल २०२५ रोजी मयुरीचा विवाह अभिषेक डाहुले याच्याशी मोठ्या आनंदाने पार पडला. पण लग्नाच्या काहीच दिवसांत तिचे आयुष्य दुःखाच्या आणि अत्याचाराच्या चक्रव्यूहात अडकले. सासरच्यांनी लग्नात अपेक्षित खर्च न केल्याचा राग मनात धरून मयुरीकडे सतत पैशांची मागणी सुरू केली. नवविवाहित असतानाही, अभिषेकचे वडील दीपक डाहुले, आई कुसुम डाहुले आणि भाऊ आदित्य डाहुले यांच्याकडून मयुरीला मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागत होता.

मयुरीने आधी आपल्या वडिलांना ही परिस्थिती सांगितली नव्हती. तिने वाट पाहिली की कदाचित नव्याने सुरु झालेलं हे नातं काही काळानंतर सुरळीत होईल. मात्र माहेरी आल्यावर तिने वडिलांना सत्य सांगितले. वडिलांनी गटाच्या भीशीमधून २० हजार रुपये सासरकडच्यांना दिले. पण जाच काही थांबला नाही. अखेर ३० मे रोजी मयुरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी पती अभिषेक डाहुले, सासरे दीपक डाहुले, सासू कुसुम डाहुले व दीर आदित्य डाहुले यांना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा समोर येणाऱ्या हुंडाबळीच्या घटनांमुळे चिंता

 

या प्रकाराच्या घटना महाराष्ट्रात चिंताजनक वेगाने वाढत आहेत. वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या, निषेध मोर्चे निघाले. मात्र प्रशासन आणि समाज यांच्याकडून या विषयाकडे पुरेसं गांभीर्याने पाहिलं जात नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे.हुंडा प्रथा ही कायद्यानं गुन्हा असूनही, अनेक ठिकाणी ती अजूनही पिढ्यानपिढ्या चालू आहे. लग्नानंतर काहीच दिवसांत नवविवाहित महिलांवर होणारा मानसिक व शारीरिक छळ, कधी थेट हत्येच्या स्वरूपात, तर कधी आत्महत्येच्या प्रकरणांमधून समोर येतो. महिलांवर होणारा हा अन्याय थांबवण्यासाठी केवळ कायदे नव्हे, तर समाजातही जागरूकतेचा मोठा उठाव होण्याची गरज आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

जनावरांसाठी बांधलेल्या दवाखान्यात माणसांवर उपचार; 24 गावांतील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Saturday, 12 September 2026, 12:16

Baramati News: मैत्रिणीकडे जाण्याच्या बहाण्याने घर सोडलं, पुढे घडलं धक्कादायक! पोलिसांच्या समुपदेशनानंतर सत्य आलं समोर

Saturday, 12 September 2026, 11:53

पुण्यात वाहनचोर टोळीचा पर्दाफाश; 10 लाखांच्या 14 दुचाकी जप्त! पिंपरी-चिंचवडसह इतर जिल्ह्यांतील 12 वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस

Saturday, 12 September 2026, 11:49

कल्याणीनगरमध्ये वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश! तीन महिलांची सुटका, रिक्षाचालकासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

Saturday, 12 September 2026, 11:45

आकाश पाळण्यात बसली अन् काही क्षणात तिच्या डोक्याची चामडी निघाली; यात्रेत महिलेसोबत नेमकं काय घडलं?

Saturday, 12 September 2026, 11:12

फक्त 600 रुपयांसाठी मित्राचा जीव घेतला! उसने दिलेले पैसे मागितले अन् त्याने चाकूने सपासप वार करून संपवले; पुण्यात खळबळ

Saturday, 12 September 2026, 10:41
Next Post

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली आणखी एका पंजाबी युट्यूबरला अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp