Thursday, August 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नाशिकमध्ये रुपालीच्या मृत्यूचं गूढ उकललं! प्रियकरानेच रिसॉर्टवर बोलावलं अन् अनैतिक संबंधांचा झाला भयंकर शेवट

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 20 August 2026, 11:24

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील वाडीवऱ्हे परिसरातील एका रिसॉर्टबाहेर घडलेल्या तरुणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. सुरुवातीला अपघात वाटणारी ही घटना प्रत्यक्षात प्रेमसंबंधातील वादातून झालेला खून असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी अंबड येथील संशयित आरोपी प्रियकर दीपक शिवाजी सैंदाणे (वय 43) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, अंबड परिसरातील एकदंतनगर येथे राहणाऱ्या रूपाली नीलेश पाटील (वय 34) या सिडकोतील एका डायग्नोस्टिक सेंटरमध्ये कार्यरत होत्या. व्यावसायिक कामानिमित्त त्या दीपक सैंदाणेसोबत कारने वाडीवऱ्हे परिसरात गेल्या होत्या. सांजेगाव येथील ‘मिरची’ हॉटेल-रिसॉर्टमध्ये जेवणासाठी जाण्यापूर्वी दीपकने गाडीतच मद्यप्राशन केले होते.

रिसॉर्टमध्ये पोहोचल्यावर दोघांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक झाली. या वादाचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले. त्यामुळे अत्यंत संतप्त झालेल्या रूपाली कारमधून बाहेर पडून रिसॉर्टच्या मुख्य दरवाजाच्या दिशेने चालू लागल्या.संतापाच्या भरात दीपकने भरधाव वेगात कार चालवून रूपाली यांना मागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत कारखाली चिरडल्या गेल्यामुळे रूपाली यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर दीपकने कारवरील ताबा सुटल्यामुळे अपघात झाल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी दीपकला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्याने स्वतःच्या गुन्ह्याची कबुली दिली. मागील 2 वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याचेही तपासात समोर आले आहे.

 

मृत रूपाली यांच्या पश्चात पती, 7 वर्षांची लहान मुलगी आणि सासू-सासरे असा परिवार आहे. या धक्कादायक घटनेमुळे सिडको आणि अंबड भागात मोठी खळबळ उडाली आहे. वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नाशिकमध्ये रुपालीच्या मृत्यूचं गूढ उकललं! प्रियकरानेच रिसॉर्टवर बोलावलं अन् अनैतिक संबंधांचा झाला भयंकर शेवट

Thursday, 20 August 2026, 11:24

तलवार, कटावणी घेऊन कारमधून निघाले अन् पोलिसांनी अडवलं; इंदापूर पोलिसांनी उधळला मोठा डाव, एकाला अटक

Thursday, 20 August 2026, 11:05

‘मुलगी आहे? मग गर्भपात कर!’ पुण्यातील PSI पतीवर पत्नीचा गंभीर आरोप; 7 महिन्यांची गर्भवती असतानाही केली मारहाण

Thursday, 20 August 2026, 10:55

बँकेसमोर दुचाकीला लटकवली पिशवी अन् काही मिनिटांत गायब! उरुळी कांचनमध्ये 1 लाखांसह कुटुंबाची महत्त्वाची कागदपत्रे चोरट्याने लांबवली

Thursday, 20 August 2026, 10:51

‘कर्करोगामुळे मला खूप त्रास होतोय…’ पत्नीला शेवटचं सांगितलं, ती जेवण आणायला गेली अन् समोर दिसला पतीचा जळून खाक झालेला मृतदेह; वडगाव रासाई येथील घटना

Thursday, 20 August 2026, 10:46

लाडकी बहीण योजनेला धक्का! 92 लाख महिला अपात्र; आता फक्त पात्र लाभार्थींनाच मिळणार 1,500 रुपयांचा लाभ

Thursday, 20 August 2026, 10:40
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.