Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Msedcl News : पूर्व हवेलीतील महावितरण वसुलीत अव्वल, सेवेत ढिम्मच!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 14 May 2026, 19:29

Msedcl News  लोणी काळभोर, ता. ६ : अवकाळी उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता पावसापेक्षा महावितरणच्या विजेचीच अधिक भीती वाटू लागली आहे. पूर्व हवेली परिसरात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, रखडलेली देखभाल कामे आणि निष्क्रिय प्रशासनामुळे हजारो नागरिकांचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. “महावितरणचा निष्काळजीपणा आता नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांतून उमटत आहे. Msedcl News

लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, थेऊर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह २० हून अधिक गावांमध्ये दिवसातून अनेकदा वीज खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. काही ठिकाणी नवीन उपकेंद्रांचा अभाव, तर काही भागांत जुनाट यंत्रणा आणि ओव्हरलोडमुळे सतत ट्रिपिंग होत आहे. परिणामी घरातील ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि महिलांना उकाड्यात अक्षरशः जीव मुठीत धरून दिवस काढावे लागत आहेत. Msedcl News

पावसाळ्यापूर्वी आवश्यक असलेली झाडांची छाटणी, झोळ काढणे, केबल दुरुस्ती आणि इतर देखभाल कामे अद्यापही पूर्ण न झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. “पहिला पाऊस पडला की तासन्तास वीज गायब होणार, हे आता ठरलेलंच आहे,” अशी संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केली. Msedcl News

 

महावितरणच्या या ढिसाळ कारभाराचा फटका केवळ घरांपुरता मर्यादित राहिलेला नाही. बँका, पोलीस ठाणे, पोस्ट कार्यालये, नागरी सुविधा केंद्रे तसेच शासकीय आणि खासगी कार्यालयांमधील कामकाजावर गंभीर परिणाम होत आहे. ऑनलाईन सेवा ठप्प होत असून नागरिकांना तासन्तास हेलपाटे मारावे लागत आहेत. Msedcl News

रात्री उकाडा आणि मच्छरांच्या त्रासामुळे नागरिकांची झोप उडाली आहे. वारंवार तक्रारी करूनही महावितरणकडून केवळ “फुरसुंगी लाईनमध्ये तांत्रिक बिघाड” असेच ठरलेले उत्तर दिले जात असल्याने संताप अधिक वाढला आहे. “वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण नेमके काय करत आहे?” असा थेट सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17
Next Post

राज्यात ९.८६ कोटी मतदारांच्या घरी पोहोचणार निवडणूक 'यंत्रणा' ; महाराष्ट्रात मतदार याद्यांची 'विशेष सखोल पुनरिक्षण' मोहीम..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.