Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

MNREGA: मनरेगा योजनेचे नाव बदलून ‘पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना’ करण्यात येणार; केंद्रीय मंत्रिमंडळाकडून विधेयकाला मंजुरी

Santosh Mundeby Santosh Munde
Saturday, 13 December 2025, 13:11
MNREGA

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MNREGA) संदर्भातील महत्त्वाच्या विधेयकाला मंजुरी दिली. या निर्णयानुसार, योजनेचे नाव बदलून ‘पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना’ करण्यात येणार असून, योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कामकाजाच्या दिवसांची संख्या 100 वरून 125 दिवसांपर्यंत वाढवली जाणार आहे, अशी माहिती समोर आली दिली.

 

100 दिवसांचा रोजगार देण्याची हमी

मनरेगा ही ग्रामीण कुटुंबांच्या उपजीविकेची सुरक्षा वाढवण्यासाठी राबवली जाणारी प्रमुख सामाजिक सुरक्षा योजना आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा,  2005 अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या योजनेद्वारे पात्र ग्रामीण कुटुंबांना दर आर्थिक वर्षात किमान 100 दिवसांचा रोजगार देण्याची हमी देण्यात आली आहे. नंतर या कायद्याचे नाव महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा  असे करण्यात आले.

योजना सुरू होऊन जवळपास दोन दशके पूर्ण होत असताना, अंमलबजावणीतील अनेक त्रुटी आणि विसंगती समोर आल्या आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार, वैधानिक अधिकार असूनही केवळ सुमारे 7  टक्के कुटुंबांनाच पूर्ण 100 दिवसांचा रोजगार मिळतो. वेळेवर वेतन न मिळणे ही योजनेतील सर्वात मोठी समस्या ठरली आहे. बँकिंग प्रणालीतील अडचणी आणि प्रशासकीय विलंबामुळे अनेक प्रकरणांमध्ये 15  दिवसांच्या आत मजुरी मिळत नाही, तर विलंब भरपाईही अत्यल्प मिळत असल्याचे समोर आले आहे.

बनावट जॉब कार्डच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे

काही राज्यांमध्ये बनावट जॉब कार्डच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे वेतन काढल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. डिजिटल उपस्थिती प्रणालीत डुप्लिकेट फोटो, चुकीचा डेटा अपलोड आणि तांत्रिक त्रुटींमुळे अडचणी वाढल्या असून, परिणामी अनेक राज्यांना ही प्रणाली तात्पुरती स्थगित करून मॅन्युअल पडताळणीचा मार्ग स्वीकारावा लागला आहे.

अनेक विसंगती समोर

याशिवाय, मनरेगाअंतर्गत हाती घेतली जाणारी अनेक कामे स्थानिक गरजांशी सुसंगत नसल्याची तक्रार आहे. काही ठिकाणी कामांचा दर्जा निकृष्ट असल्याचे किंवा कामे अपूर्ण राहिल्याचेही आढळून आले आहे. अर्थसंकल्पीय मर्यादा, अपुरी लेखापरीक्षण व्यवस्था आणि स्थानिक पातळीवरील देखरेखीचा अभाव यामुळेही अंमलबजावणीवर परिणाम झाला आहे.

या पार्श्वभूमीवर, योजना अधिक प्रभावी, पारदर्शक आणि भविष्यातील गरजांशी सुसंगत बनवण्यासाठी केंद्र सरकार मनरेगाच्या संपूर्ण रचनेत व्यापक सुधारणा करण्याचा विचार करत आहे.

दरम्यान, पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने पुढील वर्षी देशभरात १ कोटी नवीन जलसंचय संरचना उभारण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. ही कामे लोकसहभागातून आणि मनरेगा अंतर्गत उपलब्ध निधीद्वारे राबवली जाणार आहेत. पाणीटंचाईने गंभीरपणे प्रभावित ‘डार्क झोन’ जिल्ह्यांमध्ये मनरेगाच्या निधीपैकी  65 टक्के, ‘यलो झोन’ जिल्ह्यांमध्ये 40 टक्के, तर सामान्य जिल्ह्यांमध्ये 30 टक्के निधी जलसंधारण कामांसाठी खर्च करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post
Pune Crime: Pity something is wrong! He was caught by the police due to strange gestures and later something strange was found in his bag, incident at Pune airport

Pune Crime: दया कुछ तो गडबड है! विचित्र हावभावांमुळे पोलिसांच्या तावडीत सापडला अन् नंतर बॅगमध्ये सापडलं भलतंच काही, पुणे विमानतळावरील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.