Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूरमधील कुख्यात गुंड विशाल पंदीच्या टोळीवर ‘मोक्का’चा दणका; 11 जणांवर कारवाई

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 26 August 2026, 21:41

अक्षय टेमगिरे

शिरूर : शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर अग्निशस्त्रांचा वापर करून गोळीबार करत दहशत निर्माण करणाऱ्या आणि खून करून वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुख्यात गुंड इशप्पा ऊर्फ विशाल जगन्नाथ पंदी( वय 25, रा. वाघोली, ता. हवेली, जि. पुणे )याच्यासह त्याच्या गुन्हेगारी टोळीतील 11 जणांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मोक्का अंतर्गत कारवाई करण्यास विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांनी मंजुरी दिली आहे.

शिरूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या विविध कलमांसह भारतीय हत्यार कायदा आणि मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात गोळीबार करून एका तरुणाचा खून तर दुसऱ्या व्यक्तीवर जीवघेणा हल्ला तसेच फिर्यादीच्या दिशेने गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.

करडे घाटात गोळीबार एकाचा खून

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जून 2026 रोजी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास सरदवाडी हद्दीतील करडे घाट परिसरातील राजस्थान ढाब्याजवळ हा प्रकार घडला होता.फिर्यादी उमेश अनिल जगदाळे हे मित्रांसह टोयोटा टायझर कारने शिरूरच्या दिशेने जात असताना लाल रंगाच्या किया सोनेट कारने त्यांच्या कारला धडक दिली.त्यानंतर कारमधून विशाल पंदी याच्यासह पाच जण आणि मोटारसायकलवरून दोघे घटनास्थळी आले. पूर्वीच्या पैशांच्या व्यवहाराच्या वादातून जमावाने हल्ला केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.

यावेळी विशाल सुनील काळे (वय ३१, रा. डोरआळी, शिरूर) याच्यावर गोळीबार करून तसेच दगडाने मारहाण करून त्याचा खून केल्याचा आरोप आहे.याचवेळी केदार चंद्रकांत झाडगे (वय २५, रा. कुंभारआळी, शिरूर )याच्या डोक्यात घातक हत्याराने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.तसेच फिर्यादीच्या दिशेनेही गोळीबार करण्यात आला होता.

तपासात 11 आरोपींचा सहभाग निष्पन्न

या गंभीर गुन्ह्याचा तपास शिरूर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांनी संयुक्तपणे सुरू केला. तपासादरम्यान एकूण 11 आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला आहे.टोळीप्रमुख इशप्पा ऊर्फ विशाल जगन्नाथ पंदी याच्यासह अमन ऊर्फ मुन्ना दस्तगीर पटेल, सनी संजय यादव, आदित्य बापुसो ऊर्फ बापू शिंदे, आदित्य दीपक कांबळे, पांडुरंग बालाजी कांबळे, अभिषेक ऊर्फ घ्या हनुमान मिसाळ, सिद्धेश ऊर्फ सिद्धार्थ ऊर्फ बाल्या तुकाराम शिंदे, सुरज ऊर्फ नन्या संतोष मोरे आणि देवानंद शिवाजी चव्हाण या दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.सर्व अटक आरोपी न्यायालयीन कोठडीत असून आरोपी गोपाळ संजय यादव हा फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

टोळीवर 22 गुन्ह्यांची नोंद

पोलिसांच्या माहितीनुसार, या टोळीतील सदस्यांविरुद्ध शिरूर, लोणीकंद, वाघोली, फुरसुंगी, सांगवी, तळेगाव दाभाडे तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील एमआयडीसी पोलीस ठाणे आदी विविध पोलीस ठाण्यांमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी, दरोडा, सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला, घातक हत्यारे व अग्निशस्त्र बाळगणे, बेकायदेशीर जमाव, मारहाण आणि संघटित गुन्हेगारीसह विविध स्वरूपाचे एकूण 22 गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.

टोळीची वाढती दहशत, संघटित स्वरूपातील गुन्हेगारी आणि परिसरातील शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने पोलिसांनी मोक्का कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला होता.

विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून मोक्काची मंजुरी

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या माध्यमातून मोक्का कायद्यांतर्गत कलमांची वाढ करण्यासाठी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, रंजनकुमार शर्मा यांनी कागदपत्रांची पडताळणी करून या संघटित गुन्हेगारी टोळीविरुद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाईस कायदेशीर मंजुरी दिली.

मंजुरीनंतर या गुन्ह्याचा पुढील तपास शिरूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्याकडे वर्ग करण्यात आला असून यापूर्वी गुन्ह्याचा तपास शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील करीत होते.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची कारवाई

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला होता.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या….! मुंबई-पुण्यात विसर्जनाचा जल्लोष; बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची तुफान गर्दी

Friday, 25 September 2026, 8:21

पुणेकरांनो लक्ष द्या! गणेश विसर्जनासाठी मेट्रो 41 तास नॉनस्टॉप; 6 प्रमुख स्थानकांवर एन्ट्री-एक्झिटचे नियम बदलले

Friday, 25 September 2026, 7:58

ढोल-ताशा पथकांना नियमांचा ‘ब्रेक’!पुण्यात 120 ठिकाणी ध्वनिपातळीवर पोलिसांची नजर,आवाजाला लगाम…

Friday, 25 September 2026, 7:43

मान्सूनच पुन्हा जोरदार कमबॅक! मुसळधार पावसाचा हायअलर्ट; गरज असेल तरच घराबाहेर पडा

Friday, 25 September 2026, 7:27

अनंत चतुर्दशीला बाप्पाची खास कृपा! ‘या’ राशींचे नशीब चमकणार; पैसा, नोकरी आणि प्रेमात मोठ्या घडामोडी

Friday, 25 September 2026, 7:12

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट आणि डेक्कनवरून सुटणाऱ्या पीएमपी बसचे थांबे बदलले

Thursday, 24 September 2026, 22:59
Next Post

मॉडिफाइड सायलेन्सर विरोधात शिक्रापूर पोलिसांची धडक कारवाई, 22 दुचाकीस्वारांकडून 22 हजारांचा दंड वसूल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp