Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

न्हावरे परिसरात एमडी ड्रग्सविरोधात मोठी कारवाई; 12 लाख 20 हजाराचा मुद्देमाल जप्त, दोघे अटकेत

योगेश मारणेby योगेश मारणे
Wednesday, 26 August 2026, 20:22

न्हावरे : शिरूर तालुक्यात वाढत्या एमडी ड्रग्सच्या गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी),शिरूर पोलीस आणि न्हावरे पोलिसांनी संयुक्तपणे मोठी कारवाई करत सुमारे 57 ग्रॅम एमडी(मेफेड्रोन)ड्रग्स जप्त केले. या कारवाईत अंदाजे 12 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून,दोघांना अटक करण्यात आली आहे.तसेच एक जण फरार असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप विठ्ठल कोरेकर(वय 24,रा. न्हावरे,ता.शिरूर,जि.पुणे)आणि साईनाथ जनार्दन भोसेकर (वय 23रा.कारेगाव, ता.शिरूर, जि.पुणे) या दोघांना अटक करण्यात आली असून, ज्ञानेश उर्फ माऊली काळुराम कोरेकर (रा.न्हावरे,ता.शिरूर,जि.पुणे) हा फरार आहे.एमडी ड्रग्सच्या व्यवहाराबाबत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर एलसीबी, शिरूर पोलीस आणि न्हावरे पोलीस यांनी संयुक्तपणे सापळा रचला.न्हावरे-तळेगाव महामार्गालगत असलेल्या शेळके वस्ती परिसरात आज(ता.२६)ही कारवाई करण्यात आली.

गेल्या अनेक दिवसांपासून न्हावरे व परिसरात एमडी ड्रग्सची विक्री होत असल्याचा संशय पोलिसांना होता.त्यामुळे संबंधित संशयितांवर गुप्तपणे नजर ठेवण्यात येत होती. अखेर खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.

या प्रकरणामुळे शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात अंमली पदार्थांचे वाढते जाळे पुन्हा एकदा समोर आले आहे.कारेगाव,न्हावरे, श्रीगोंदा,यवत आणि केडगाव परिसरापर्यंत एमडी ड्रग्सचे नेटवर्क पोहोचले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.तसेच या रॅकेटमध्ये आणखी काही तरुणांचा सहभाग असल्याची चर्चा असून, पुढील तपासात अंमली पदार्थांच्या पुरवठा साखळीमागील सूत्रधारांचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

 

गावपातळीपर्यंत आणि वाडी-वस्त्यांपर्यंत एमडीसारख्या घातक अंमली पदार्थांचा शिरकाव होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.त्यामुळे फरार संशयिताचा शोध घेण्याबरोबरच या संपूर्ण नेटवर्कचा भांडाफोड करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

दरम्यान,एलसीबी,शिरूर आणि न्हावरे पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे एमडी ड्रग्सच्या व्यवहाराला मोठा धक्का बसला असून,पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले,स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख प्रमोद क्षीरसागर,शिरूरचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर शेळके करीत आहेत.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उरुळी कांचन पोलिसांचा ‘बुलेट राजांना’ दणका; 13 गाड्यांवर कारवाई; 29 सायलेन्सरवर फिरवला बुलडोझर

Thursday, 24 September 2026, 13:39

एक-दोन नव्हे, तब्बल 109 गुन्ह्यांची नोंद, लोणी काळभोरच्या अट्टल गुन्हेगाराला लोणंद पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Thursday, 24 September 2026, 13:14

दिवेघाटात रात्री तरुणावर हल्ला करून आरोपी फरार; बनावट नंबर प्लेट, बंद मोबाईल अन् 65 सीसीटीव्ही तपासले अन् अखेर आरोपी फुरसुंगी पोलिसांच्या जाळ्यात

Thursday, 24 September 2026, 13:09

नागरगावात दोन ट्रान्सफार्मर फोडून 84 हजारांच्या तांब्याच्या तारांची चोरी

Thursday, 24 September 2026, 12:52

साहिल वाकोडे प्रकरणात राहुल गांधींची थेट एंट्री! आई-वडिलांशी फोनवर काय बोलले?

Thursday, 24 September 2026, 12:44

गणेश विसर्जनाच्या दिवशी आभाळ भरून येणार; महाराष्ट्रातील ‘या’ भागांना मुसळधार पावसाचा इशारा

Thursday, 24 September 2026, 12:35
Next Post

पुण्यात आणखी एक महाकाय MIDC! चाकण-रांजणगावला टक्कर देणार 743 हेक्टरचं नवं इंडस्ट्रियल हब; ‘या’ भागात उभारणीला वेग

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp