Maharashtra voters list : मुंबई : महाराष्ट्रात सुरू असलेल्या मतदारयादी पुनरिक्षण मोहिमेमुळे राज्यातील मतदारसंख्येतील मोठा फुगवटा समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आगामी सखोल विशेष फेरतपासणी मोहिमेत राज्यातील तब्बल ९० लाख ते १ कोटी मतदारांची नावे मतदारयादीतून वगळली जाऊ शकतात, अशी माहिती निवडणूक विभागातील सूत्रांकडून मिळत आहे. Maharashtra voters list
या मोहिमेत मुख्यतः दुबार नोंदी, मृत मतदार तसेच स्थलांतरित नागरिकांची नावे शोधून ती वगळण्यावर भर दिला जाणार आहे. सध्या महाराष्ट्रात ९ कोटी ८८ लाखांहून अधिक नोंदणीकृत मतदार आहेत. ३० जूनपासून राज्यभर सखोल विशेष फेरतपासणी मोहीम राबवली जाणार असून, त्याआधी एसआयआर पूर्व सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. Maharashtra voters list
या सर्वेक्षणात विद्यमान मतदारांची माहिती २००२ मधील सघन पुनरिक्षण मोहिमेतील नोंदींशी जुळवून पाहण्याचे काम सुरू आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे आणि नवी मुंबईसारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असल्याने ही प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. Maharashtra voters list
मुंबई शहरात सुमारे ५५ टक्के, तर मुंबई उपनगरात केवळ ४७ टक्के मॅपिंग पूर्ण झाले आहे. त्यामुळे याच शहरी भागांत सर्वाधिक नावे वगळली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या मुंबईत सुमारे १ कोटी ४ लाख, पुण्यात ९१ लाख ४० हजार आणि ठाण्यात ७५ लाख नोंदणीकृत मतदार आहेत. Maharashtra voters list
दरम्यान, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नागरिकांची गाव आणि शहर अशा दोन्ही ठिकाणी मतदार म्हणून नोंदणी असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे राज्यात दुबार मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचा अंदाज आहे.निवडणूक आयोगाच्या प्राथमिक निरीक्षणानुसार राज्यातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत विद्यमान मतदारसंख्येमध्ये मोठी विसंगती दिसून येत आहे. त्यामुळे या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर अपात्र नावे वगळली जाण्याबरोबरच, नव्याने पात्र ठरलेल्या मतदारांची नोंदणीही केली जाणार आहे. Maharashtra voters list
दरम्यान, २००२ नंतर प्रथमच एवढ्या व्यापक प्रमाणावर सघन पुनरिक्षण मोहीम राबवली जात असल्याने महाराष्ट्राच्या मतदार यादीत मोठे बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Maharashtra voters list







