Monday, May 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुण्यातील भोंदू बाबाला न्यायालयाचा दणका! लैंगिक अत्याचार प्रकरणी ऋषिकेश वैद्यचा जामीन अर्ज फेटाळला

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 18 May 2026, 18:16

Pune News : पुणे, ता. 18 : देवी शक्तीचा संचार असल्याचा बनाव करून महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर आरोपांमध्ये अटकेत असलेल्या भोंदू ऋषिकेश वैद्य याला न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी वैद्यचा जामीन अर्ज फेटाळून लावत गुन्ह्याचे गांभीर्य आणि प्रकरणातील परिस्थिती लक्षात घेता आरोपी जामिनासाठी पात्र नसल्याचे स्पष्ट केले. Pune News

सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या ऋषिकेश वैद्य याने जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र सरकारी पक्षाकडून ॲड. लीना पाठक तसेच फिर्यादीच्या वतीने ॲड. रोहन नहार यांनी जोरदार विरोध केला. त्यांना ॲड. ओंकार फडतरे, ॲड. गायत्री पोटवडे आणि ॲड. चैतन्य अभंग यांनी सहकार्य केले. Pune News

 

सरकारी पक्षाने न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, आरोपीने धार्मिक गुरू म्हणून निर्माण झालेल्या विश्वासाचा गैरफायदा घेत पीडित महिलेला जाळ्यात ओढले आणि तिच्यावर अत्याचार केला. प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. अशा परिस्थितीत आरोपीला जामीन दिल्यास तो साक्षीदारांवर दबाव टाकू शकतो किंवा पुरावे प्रभावित करू शकतो, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली. Pune News

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत गंभीर असल्याचे नमूद करत आरोपीला जामीन देण्यास नकार दिला. “जामीन मिळण्यासाठी आवश्यक असलेला प्रथमदर्शनी आधार आरोपी सिद्ध करू शकलेला नाही,” असे निरीक्षण न्यायालयाने आदेशात नोंदवले. Pune News

दरम्यान, डिसेंबर २०२३ ते ११ मे २०२५ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे तपासात समोर आले आहे. २७ मार्च २०२६ रोजी हडपसर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर २८ मार्च रोजी पोलिसांनी ऋषिकेश वैद्यला अटक केली होती. Pune News

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियाच्या माध्यमातून पीडित महिलेशी ओळख करून आरोपीने “मी देवाचा भक्त असून तुला विशेष उपासना शिकवतो,” असे सांगत तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर धार्मिक विधी आणि देवी शक्तीच्या नावाखाली तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. Pune News

नाशिकमधील कॅप्टन अशोक खरात प्रकरण राज्यभर गाजत असतानाच पुण्यात उघडकीस आलेल्या या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली होती. आता न्यायालयाने जामीन नाकारल्याने आरोपीच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. Pune News

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Indapur : इंदापूरमध्ये उजनी धरणग्रस्तांचा जनआक्रोश! “जमीन आमची, हक्क आमचा”च्या घोषणांनी तहसील कार्यालय दणाणलं

Monday, 18 May 2026, 18:48
JEE Main 2025 Session 2 and CBSE Board Exams on Same Dates

MSBSHSE : दहावी-बारावीच्या परीक्षा होणार ‘सोप्या’? प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बदलण्याची प्रक्रिया मंडळाकडून सुरू..

Monday, 18 May 2026, 18:33

Pune Murder Case : पुण्यात अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा धारदार शस्त्राने खून; आरोपी फरार

Monday, 18 May 2026, 18:31

Mumbai-Ahmedabad Road : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला; १२ जणांचा मृत्यू, ३० हून अधिक जखमी

Monday, 18 May 2026, 18:20

Pune News : पुण्यातील भोंदू बाबाला न्यायालयाचा दणका! लैंगिक अत्याचार प्रकरणी ऋषिकेश वैद्यचा जामीन अर्ज फेटाळला

Monday, 18 May 2026, 18:16
International flights to operate from Pune airport’s new terminal starting today

Pune Airport : पुणे विमानतळावर दोन बांगलादेशी महिलांसह अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या जाळ्यात

Monday, 18 May 2026, 18:11
Next Post

Mumbai-Ahmedabad Road : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला; १२ जणांचा मृत्यू, ३० हून अधिक जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.