Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखने ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदकास गवसणी घालावी : हर्षवर्धन पाटील

सागर जगदाळेby सागर जगदाळे
Tuesday, 28 November 2023, 18:55

सागर जगदाळे

भिगवण  : ”महाराष्ट्रात कुस्ती क्षेत्राचा मोठा नवलौकिक आहे. कुस्ती ही महाराष्ट्राची शान आहे, वैभव आहे. या क्षेत्रामध्ये कुस्तीपटू सिकंदर शेख यांनी महाराष्ट्र केसरी या स्पर्धेत आपले यश संपादन केले. सिकंदर शेख हे मंत्रालयात जाऊन आले आहेत. सरकार आपले आहे. आम्ही सहकार्य करू. सिकंदर शेख यांच्याकडून ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदकाची अपेक्षा आहे”, असे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांचा आज इंदापूर येथील भाग्यश्री निवासस्थानी हर्षवर्धन पाटील यांनी सन्मान करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी इंदापूर तालुक्यातील मोठ्या संख्येने कुस्ती क्षेत्रातील मल्ल उपस्थित होते.

 

हर्षवर्धन पाटील म्हणाले की,”महाराष्ट्रात कुस्ती क्षेत्राचा मोठा नवलौकिक आहे. कुस्ती ही महाराष्ट्राची शान आहे, वैभव आहे. या क्षेत्रामध्ये कुस्तीपटू सिकंदर शेख यांनी महाराष्ट्र केसरी या स्पर्धेत आपले यश संपादन केले. कुस्ती क्षेत्रातील सिकंदर शेख यांची कामगिरी कौतुकास्पद आहे. इंदापूर तालुक्यात देखील कुस्ती क्षेत्राला मोठे महत्त्व आहे.

2005 यावर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आपण इंदापूर तालुक्यात आयोजन केले होते. आम्ही मंत्रिमंडळात असताना शासन अध्यादेश काढला होता की महाराष्ट्र केसरी झाला की त्या कुस्तीपटूला क्लास टू (वर्ग -2) ची नोकरी द्यायची आता क्लास वनची नोकरी दिली जाते”.

”सिकंदर शेख हे मंत्रालयात जाऊन आले आहेत. सरकार आपले आहे. आम्ही सहकार्य करू. सिकंदर शेख यांच्याकडून ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. दरवर्षी आपण निराभिमा कारखाना परिसरामध्ये शहाजी केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करतो,” असेही त्यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार बापूसाहेब पठारे, महाराष्ट्र केसरी सईद चाऊस यांनी मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांनी केलेल्या सत्कारबद्दल आभार व्यक्त केले. गंगावेस तालीमचे वस्ताद विश्वासदादा हारुगले तसेच इंदापूर तालुक्याच्या परिसरातील कुस्ती क्षेत्रातील अनेक मल्ल यावेळी उपस्थित होते.

सागर जगदाळे

सागर जगदाळे

अडीज वर्ष दैनिक पुण्यनगरी काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये भिगवण येथील प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील बातम्या लिहिण्याचा खूप मोठा अनुभव आहे.

ताज्या बातम्या

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56

बाप की नराधम! पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या वेळी एकट्यात गाठलं अन् वासनेचा शिकार….

Sunday, 5 July 2026, 14:44

भोर–महाड मार्गावरील वरंधा घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 5 July 2026, 14:34

कोंढव्यातील ‘त्या’ फार्महाऊसवर सुरु होतं भलतंच कृत्य! पोलिसांनी सापळा रचत छापा टाकला अन् आत १० जण…

Sunday, 5 July 2026, 14:20

मुंडेंच्या FDA चा मोठा भांडाफोड; गोरेपणाच्या क्रीममध्ये कॅन्सरकारक रसायनांचा काळाबाजार उघड

Sunday, 5 July 2026, 14:05

पुणे विमानतळावर थरार! धावपट्टीवर कुत्रा दिसताच वैमानिकांनी लावले इमर्जन्सी ब्रेक; मोठी दुर्घटना टळली

Sunday, 5 July 2026, 13:09
Next Post
advay-hire-bail application rejected by malegaon court

Advay Hire: अद्वय हिरे यांचा जामीन फेटाळला, मुक्काम कोठडीतच

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.