Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Madhya Pradesh Election Result 2023 : मध्य प्रदेशातील भाजपच्या विजयाची ‘ही’ मुख्य कारणे; मुख्यमंत्री पदाची धूरा कुणाकडे?

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 3 December 2023, 16:18

Madhya Pradesh Election Result 2023 : मध्य प्रदेश ( भोपाळ ) : भाजपने मध्य प्रदेशात मोठा विजय संपादन केला आहे. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजपने चतुराईने केलेले बदल या विजयाला कारणीभूत ठरले आहेत. मध्य प्रदेशात भाजपच्या विजयानंतर तिथे मुख्यमंत्री होण्यासाठी तीन नावे पुढे आहेत. त्यात प्रामुख्याने शिवराजसिंह चौहान, नरेंद्र सिंह तोमर आणि प्रल्हाद पटेल यांची नावे पुढे आहेत. एकंदरीत भाजपच्या विजयाची मुख्य कारणे आणि मुख्यमंत्री पदाची धूरा कुणाकडे असणार पाहूयात,

१. मध्य प्रदेशमध्ये ज्या भागात भाजपसाठी निवडणूक अवघड ठरण्याची शक्यता होती तिथे भाजपने केंद्रीय मंत्र्यांना विधानसभेची निवडणूक लढवायला लावली. त्यामुळे केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. याचा परिणाम म्हणून मागील वेळी ज्या मुरैना आणि चंबळ खोर्‍यात भाजप उमेदवारांचा पराभव झाला होता तिथे देखील भाजपचा विजय झाला. ज्यामुळे भाजपची संपूर्ण यंत्रणा पूर्ण क्षमतेने कामाला लागली.

२. २०१८ साली राज्यात सत्तेत आलेल कॉंग्रेस सरकार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कॉंग्रेस सोडून भाजपमधे प्रवेश केल्याने गडगडले. ज्यामुळे कमलनाथ यांच्याबद्दल लोकांमधे सहानुभूती निर्माण झाली. पण ही सहानुभूती मतदानात रुपांतरीत होऊ शकली नाही. कॉंग्रेसबाबत असलेली सहानुभूती मतदानामध्ये रुपांतरीत करण्यात कॉंग्रेस नेते कमी पडले.

 

३. २०१४ प्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच भाजपच्या प्रचाराचा चेहरा राहिले होते. शिवराजसिंह चौहान यांच्या 18 वर्षे मुख्यमंत्री राहण्याने त्यांच्याबद्दल निर्माण झालेली अँन्टी इन्कंबन्सी आपोआप यामुळे झाकोळली गेली. निवडणूक निकालानंतर शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री बनणार नाहीत ही चर्चा भाजपच्या गोटातून सातत्याने घडवून आणली गेली. ज्यामुळे बदल हव्या असलेल्या मध्य प्रदेशातील मतदारांना स्वतःकडे राखण्यात भाजपला यश आलं.

४. भाजपला महिलांची बंपर मते मिळवून देण्यासाठी लाडली बहेन योजना उपयोगी ठरली आहे. जून महिन्यात या योजनेला सुरुवात झाली. महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा व्हायला लागल्याने महिला मतदारांनी इतर सर्व प्रश्न बाजूला सारून कमळाच्या चिन्हावर बोट दाबलं. सुरुवातीला महिलांच्या खात्यात एक हजार रुपये जमा होऊ लागले. पुढे त्यामधे वाढ होऊन ते साडे बाराशे रुपये झाले. आणि निवडणुकीनंतर त्यामधे तीन हजार रुपयांपर्यंत वाढ करण्याच आश्वासन महिलांना देण्यात आलं. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात महिलांच मतं भाजपला मिळाली.

मुख्यमंत्री कोण असेल?

१. शिवराजसिंह चौहान हे वीस वर्षे मुख्यमंत्रिपदावर राहिल्याने त्यांच्याबद्दल एक प्रकारची नाराजी असल्याचं चित्र होतं. त्यामुळे भाजप पुन्हा शिवराजसिंह चौहान यांना संधी देण्याची शक्यता कमी आहे.

२. नरेंद्र सिंह तोमर आणि प्रल्हाद पटेल हे विधानसभेला विजयी झाल्याने ते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असतील. राजपूत असलेले नरेंद्र सिंह तोमर हे भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असू शकतात.

३. भाजप मध्य प्रदेशमधे नवीन चेहर्‍याचा विचार मुख्यमंत्रिपदासाठी करु शकतं. अनपेक्षितपणे मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची माळ नव्या व्यक्तीच्या गळ्यात पडून शकते.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38
Next Post
AAP Performance In Mp Rajasthan Chhattisgarh And Telangana Election Result 2023

अरविंद केजरीवाल यांच्या 'आप'ला मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काय मिळाले? जाणून घ्या आकडेवारी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.