Tuesday, October 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“घरात अर्धा हिस्सा पाहिजे!” सख्ख्या भावाचा संताप अनावर, नारायणगावात 62 वर्षीय शेतकऱ्याच्या डोक्यात मारला दगड

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 19 October 2026, 12:15

नारायणगाव, ता. 19 : घराच्या दुरुस्तीच्या कामावरून सुरू झालेला वाद मालमत्तेतील हिस्स्याच्या मागणीपर्यंत पोहोचला आणि त्यातून 62 वर्षीय शेतकऱ्याला मारहाण झाल्याची घटना नारायणगाव येथील गव्हाळीमळा, खोडद रोड परिसरात घडली. सख्ख्या भावाने डोक्यात दगड मारून जखमी केल्याचा, तसेच लोखंडी गज फेकून मारल्याचा गंभीर आरोप फिर्यादी मोहन मारुती फुलसुंदर यांनी केला आहे. या प्रकरणी श्रीकांत मारुती फुलसुंदर आणि त्यांची पत्नी वैशाली श्रीकांत फुलसुंदर यांच्याविरुद्ध नारायणगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

मोहन फुलसुंदर हे शेती व्यवसाय करतात. त्यांचा मुलगा स्वप्नील, सून सुप्रिया आणि नात स्वराली हे कामानिमित्त पुण्यात राहतात. 16 ऑक्टोबर रोजी पहाटे मोहन हे मुक्ताईदेवीच्या आरतीसाठी नारायणगाव येथे गेले होते. त्यानंतर आनंदवाडी येथील सटवाई देवीची पूजा करून त्यांनी नारायणगाव एसटी स्थानकावरून बिगारी कामगार घेतले आणि सकाळी सुमारे नऊ वाजता घरी परतले.

घरी आल्यानंतर त्यांनी कामगारांना घराच्या कामाबाबत सूचना देण्यास सुरुवात केली. त्यावेळी श्रीकांत फुलसुंदर तेथे आले आणि त्यांनी कामगारांना काम करण्यास विरोध केला. हे घर आमचे असून, येथे काम करायचे नाही, असे सांगत त्यांनी मोहन यांच्याशी वाद घातल्याचे फिर्यादीत नमूद आहे. मोहन यांनी हे घर आई-वडिलांचे असून, आपण जुन्या घरात राहणार असल्याचे सांगितल्यानंतर वाद अधिकच वाढला.

घराच्या मागील बाजूस काम सुरू असताना श्रीकांत यांनी पुन्हा तेथे येऊन शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर त्यांनी मोहन यांना बाजूला ढकलून तेथे पडलेला दगड उचलून त्यांच्या डोक्यात मारल्याचा आरोप आहे. डोक्यातून रक्तस्राव सुरू झाल्यानंतर मोहन रस्त्यावर आले असता, श्रीकांत यांनी लोखंडी गज फेकून मारल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. तसेच पुन्हा येथे आल्यास जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

जखमी अवस्थेत मोहन यांनी नारायणगाव पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी पाठविले. त्यानंतर मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. तेथे सीटी स्कॅन आणि एक्स-रे तपासणी करण्यात आली.

सायंकाळी पुन्हा वाद; मुलालाही शिवीगाळ केल्याचा आरोप
या घटनेनंतर त्याच दिवशी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास श्रीकांत आणि त्यांची पत्नी वैशाली हे मोहन यांच्या घरी आले. घरामध्ये आम्हाला अर्धा हिस्सा पाहिजे, या कारणावरून त्यांनी पुन्हा शिवीगाळ केल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. यावेळी मोहन यांचा मुलगा स्वप्नील याने मध्यस्थी करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला असता, त्यालाही शिवीगाळ व दमदाटी करण्यात आल्याचा आरोप आहे.

दरम्यान, घराच्या कामावरून सुरू झालेला वाद थेट मारहाण आणि धमकीपर्यंत पोहोचल्याने कौटुंबिक मालमत्तेच्या वादाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी मोहन फुलसुंदर यांनी श्रीकांत आणि वैशाली फुलसुंदर यांच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार दिली असून, प्रकरणातील पुढील पोलीस कारवाईबाबत माहिती उपलब्ध नाही.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! दिवाळीअगोदरच खिशात पडणार बोनस; किती रुपये मिळणार?

Tuesday, 20 October 2026, 14:45

पुणे पोलीस ॲक्शन मोडवर! ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर टोळीप्रमुखासह १० सराईत तडीपार

Tuesday, 20 October 2026, 14:36

लग्नाची स्वप्नं, घरात सून येण्याची तयारी… पण त्याआधीच मुलाचा मृत्यू; क्रिकेटच्या मैदानात काय घडलं?

Tuesday, 20 October 2026, 14:30

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? दिवाळीआधीच प्रताप सरनाईकांनी फोडला बॉम्ब; नेमकं काय म्हणाले?

Tuesday, 20 October 2026, 14:30

थेऊर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजयादशमी पथसंचलन उत्साहात!

Tuesday, 20 October 2026, 13:49

चांडोह येथे गवत तोडण्याच्या कारणावरून वाद; कोयत्याने वार करून शेतकऱ्याला जखमी केल्याचा आरोप

Tuesday, 20 October 2026, 13:34
Next Post

हवेली तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले; सहकार क्षेत्रात राजकीय शक्तिप्रदर्शन रंगण्याची शक्यता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp