Friday, April 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni kalbhor : ‘नर्सरी’ व्यवसायाच्या नावाखाली बंटी-बबलीने अनेकांना घातला लाखोंचा गंडा…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 24 April 2026, 11:45

Loni kalbhor लोणी काळभोर, ता. 24 : “नर्सरी व्यवसायात मोठा नफा मिळेल” असे गोड बोलून विश्वास संपादन करत एका व्यावसायिकाकडून तब्बल चार लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर परिसरात घडली असून सोरतापवाडी (ता. हवेली) येथील दाम्पत्यवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Loni kalbhor

 

किशोर लक्ष्मण साठे (वय अंदाजे 35) आणि अर्चना किशोर साठे (वय अंदाजे 26) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महेंद्र बाबू जैनजांगडे (वय 39,रा. सिद्राम मळा, रामदरा रोड, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र जैनजांगडे हे साईबाबा मंदिराशेजारी ‘फ्रस्टी डिलाईट’ नावाचे केक शॉप चालवतात. त्यांच्या ओळखीतील किशोर साठे याने ऑक्टोबर 2025 मध्ये नर्सरी व्यवसाय सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला होता. “तुमच्या पत्नीला नर्सरीचा अनुभव आहे, त्यामुळे हा व्यवसाय फायदेशीर ठरेल,” असे सांगत साठे याने वारंवार विश्वासात घेतले. Loni kalbhor

साठे यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. आणि जैनजांगडे यांनी 1 नोव्हेंबर 2025 रोजी दोन लाख रुपये बँकेच्या चेकद्वारे आणि दोन लाख रुपये रोख स्वरूपात साठे याला दिले. त्यानंतर काही दिवसांत व्यवसाय सुरू करू, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, दिवसेंदिवस वेळ काढत साठे नर्सरी सुरू करण्याबाबत टाळाटाळ करत राहिला. पैसे परत मागितल्यावर साठे याने डिसेंबर 2025 मध्ये 2 लाख 20 हजार रुपयांचा चेक दिला, मात्र तो बँकेत जमा केल्यानंतर बाऊन्स झाला. याशिवाय एक कोरा चेकही दिला होता. यानंतर साठे याचा संपर्क पूर्णपणे तुटला. Loni kalbhor

या प्रकरणाची चौकशी करताना साठे याने एकट्या जैनजांगडे यांनाच नव्हे, तर परिसरातील इतर अनेक नागरिकांनाही वेगवेगळ्या व्यवसायांचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. फकिर इनामदार, परविंदर दिगवा, लकी दिगवा, बाळासाहेब म्हेत्रे यांच्यासह इतर काही जणही या घोटाळ्याचे बळी ठरल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून किशोर साठे व त्याची पत्नी अर्चना साठे यांचे मोबाईल बंद असून, ते पुणे शहर सोडून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी किशोर साठे आणि अर्चना साठे या दोघांविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 3(5), 318(4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही सध्या फरार असल्याने पोलिसांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. Loni kalbhor

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

RTE Admission Process : पूर्व हवेलीसह पुणे जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेत महाघोटाळा? बोगस भाडेकराराच्या माध्यमातून श्रीमंतांनी गरीब विद्यार्थ्यांचा हक्क लाटले

Friday, 24 April 2026, 14:56
Loni kalbhor

Loni Kalbhor Crime : भररस्त्यात अडवून तरुणावर कोयत्याने हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

Friday, 24 April 2026, 13:57

Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथे विद्यार्थ्याचा लॅपटॉपवर चोरट्याने मारला डल्ला

Friday, 24 April 2026, 13:40

Bhigwan News : भिगवणच्या पावसाळी समस्यांवर अखेर हालचाल; एनएचएआयकडे ठोस उपाययोजनांची मागणी

Friday, 24 April 2026, 12:08

Pune Drug Case : पुण्यात ड्रग्ज तस्कराला अटक ; 28 लाखांचा मुद्देमाल जप्त

Friday, 24 April 2026, 11:56

Loni kalbhor : ‘नर्सरी’ व्यवसायाच्या नावाखाली बंटी-बबलीने अनेकांना घातला लाखोंचा गंडा…!

Friday, 24 April 2026, 11:45
Next Post

Pune Drug Case : पुण्यात ड्रग्ज तस्कराला अटक ; 28 लाखांचा मुद्देमाल जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.