Thursday, October 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बिबट्याचा थरार! दुचाकीस्वारांवर हल्ल्याचे 3 प्रयत्न; अकरावीत शिकणाऱ्या मुलीच्या अंगावर थेट झडप!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 15 October 2026, 11:31

पुणे : जिल्ह्यातील खडकवासला परिसरातील घेरा सिंहगड आणि खानापूर भागात बिबट्याची दहशत पुन्हा एकदा वाढली आहे. खानापूर-पाबे रस्त्यावरील थोपटेवाडी येथील बापूजीबुवा मंदिराजवळ संध्याकाळी बिबट्याने दुचाकीस्वारांवर तब्बल तीन वेळा हल्ले करण्याचा प्रयत्न केल्याची थरारक घटना समोर आली आहे. या वाढत्या घटनांमुळे स्थानिक नागरिक, शाळकरी मुलांचे पालक आणि प्रवाशांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे.संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पहिली घटना घडली.

तसेच आंबेगाव बुद्रुक येथील ओम शिंदे आणि तुषार कांबळे हे दोघे दुचाकीवरून खानापूरच्या दिशेने जात होते. रस्त्यावरील एका वळणावर अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झडप मारली. या धक्क्यातून ते सावरत असतानाच, काही अंतरावर धोंडीराम थोपटे हे आपली 16 वर्षांची मुलगी सलोनी आणि तिची मैत्रीण सोनल यांना घेऊन दुचाकीवरून जात होते. यादरम्यान, बिबट्याने पुन्हा एकदा चालत्या गाडीवर झडप घातली. या हल्ल्यात बिबट्याचा पंजा लागून सलोनी जखमी झाली.

मात्र, मुलींनी हिंमत दाखवून मोठा आवाज केल्यामुळे बिबट्याने घाबरून जंगलाच्या दिशेने पळ काढला. जखमी मुलीला तातडीने खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि नंतर पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या परिसरामध्ये गेल्या काही वर्षांपासून बिबट्याचा वावर आहे. मात्र, एकाच दिवशी एकाच भागात वारंवार हल्ले होण्याचा प्रयत्न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप आणि चिंतेचे वातावरण आहे. खानापूरचे माजी उपसरपंच नंदकुमार जावळकर यांनी वनविभागाने या प्रकरणी तातडीने पावले उचलत परिसरात गस्त वाढवावी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

घटनेची माहिती मिळताच वनपरिमंडळ अधिकारी वैशाली हाडवळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि बिबट्याचा माग घेण्याचा प्रयत्न केला. वनविभागातर्फे नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबवली जात असून, विशेषतः वनक्षेत्राजवळ किंवा दाट झाडी असलेल्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी व प्रवाशांनी रात्रीच्या वेळी एकट्याने घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

वरवंड येथे 18 लाखांची थकबाकी मागितली म्हणून बांधकाम साहित्य पुरवठादाराला बॅटने मारहाण

Thursday, 15 October 2026, 11:47

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठा खुलासा! “पाचही मारेकऱ्यांना ओळखतो, पण…” माजी महापौरांच्या पतीच्या कबुलीने तपासाला नवं वळण!

Thursday, 15 October 2026, 11:46

यूट्यूबर हरेश गजवानी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; 3 जण अटकेत, तपासाला वेग

Thursday, 15 October 2026, 11:36

बिबट्याचा थरार! दुचाकीस्वारांवर हल्ल्याचे 3 प्रयत्न; अकरावीत शिकणाऱ्या मुलीच्या अंगावर थेट झडप!

Thursday, 15 October 2026, 11:31

सोरतापवाडीतील पुरोगामी विद्यालयात शिक्षकाकडून विद्यार्थिनीशी अश्लील चाळे; नराधमाला अटक

Thursday, 15 October 2026, 11:05

कोतकरांच्या उद्योग समूहावर आयकरची नजर? पुण्यातील हॉटेल्समध्ये तपासणी, हेलिकॉप्टर खरेदीचीही चर्चा

Thursday, 15 October 2026, 10:59
Next Post

यूट्यूबर हरेश गजवानी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; 3 जण अटकेत, तपासाला वेग

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp