Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Kolhapur : अर्ज भरला अन् २४ तासांत माघार! कृष्णराज महाडिकांचा मोठा निर्णय; भाजपच्या ‘या’ एका आदेशामुळे समीकरणं बदलली!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 28 December 2025, 17:36
Kolhapur

photo- social media

Kolhapur : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये एक मोठी आणि थोडीशी अनपेक्षित घडामोड घडली आहे. माजी खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अवघ्या 24 तासांतच निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. (kolhapur)

 

प्रभाग क्रमांक तीनमधून कृष्णराज महाडिक यांनी शनिवारी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी, म्हणजे रविवारी, त्यांनी अधिकृतपणे निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून आलेल्या आदेशानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.

भाजपच्या वरच्या पातळीवर आमदार आणि खासदारांच्या कुटुंबीयांना यावेळी महापालिका निवडणुकीचं तिकीट न देण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे. त्याच निर्णयाचा मान राखत कृष्णराज महाडिक यांनी आपली उमेदवारी मागे घेतली.

आपल्या निवेदनात कृष्णराज महाडिक म्हणाले की, भाजप हा शिस्तबद्ध आणि संघटित पक्ष आहे. पक्षाचा आदेश मान्य करणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे. त्यामुळे पक्षाने घेतलेल्या निर्णयाचा आदर ठेवून आपण कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवणार नाही. पक्षाने आपल्या नावाचा विचार केला, ही बाब आपल्यासाठी समाधानाची असल्याचंही त्यांनी सांगितलं. पुढेही आपण समाजकारण आणि पक्षाच्या कामात सक्रिय राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

यावेळी भाजप महायुतीतील घटक पक्षांसोबत मिळून महानगरपालिका निवडणूक लढवत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असून तिकीट वाटपाची प्रक्रिया अधिक महत्त्वाची ठरत आहे. कृष्णराज महाडिक यांच्या माघारीमुळे इतर इच्छुक कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याचं चित्र आहे.

दरम्यान, त्यांच्या माघारीनंतर प्रभाग क्रमांक तीनसह इतर काही प्रभागांतील भाजप उमेदवारांची नावे अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच अधिकृत उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. कृष्णराज महाडिक यांच्या निर्णयामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलाच वेग आला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post
Haveli News: Sihangad Tigers team won the taluka level cricket tournament of Haveli Teachers Society

Haveli News: हवेली शिक्षक सोसायटीच्या तालुका स्तरीय क्रिकेट स्पर्धेचा मानकरी ठरला सिहंगड टायगर्स संघ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.