Friday, November 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“एक मच्छर, साला एक….नाना पाटेकरांचे गाजलेले डायलॉग आठवून प्रेक्षक भावूक,..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 8 October 2026, 8:59

पुणे : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाबाबत डॉक्टरांनी दिलेली महत्वाची माहिती समोर आली आहे.रुग्णालयात डॉक्टरांनी तब्बल 45 मिनिटे सीपीआर देऊन त्यांच्या हृदयाची हालचाल पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. परंतु, उपचारादरम्यान सकाळी 5:20 वाजता त्यांचे निधन झाल्याचे सांगितले गेले. मृत्यूचे अचूक कारण स्पष्ट व्हावे यासाठी त्यांचे वैद्यकीय आणि कायदेशीरदृष्ट्या पोस्टमॉर्टम केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या वृत्तामुळे चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांमध्ये मोठे दुःखाचे वातावरण पसरले.

नाना पाटेकर यांना गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यानंतर एका वैद्यकीय पथकाने त्यांच्या घरी पोहोचून त्यांना कार्डियाक मसाज दिला, मात्र ते बेशुद्धच होते. त्यांना तातडीने दोनापावला येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.

नाना पाटेकर हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अतिशय नामांकित आणि दिग्गज कलाकार आहेत.1978 साली ‘गमन’ या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. ही भूमिका छोटी होती. त्यानंतर त्यांनी आज की आवाज या चित्रपटात सहाय्यक म्हणून भूमिका केली. पुढे एन. चंद्रा यांच्या अंकुश या चित्रपटातून त्यांना खरी ओळख मिळाली. ‘परिंदा’ मधील त्यांच्या भूमिकेचे गारूड प्रेक्षकांच्या मनातून कधी हटलेच नाही. तिरंगा, नटसम्राट आणि अनेक चित्रपटातून त्यांनी अभिनयाची छाप सोडली.

1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘क्रांतिवीर’ या चित्रपटातील त्यांचा एक डायलॉग अत्यंत गाजला होता: “आ गए मेरी मौत का तमाशा देखने, अब मुझे लटका देंगे… फिर आप चर्चा करते घर चले जाओगे, खाना खाओगे सो जाओगे.” याच चित्रपटातील “ये मुसलमान का खून है ये हिंदू का खून…” हा संवाद आजही सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी विविध कार्यक्रमांमध्ये आवर्जून वापरला जातो.

त्यांच्या संवादांची जादू फक्त गंभीर चित्रपटांपुरतीच मर्यादित राहिली नाही, तर विनोदी भूमिकांमध्येही त्यांनी प्रेक्षकांना वेड लावले. 2007 मध्ये आलेल्या ‘वेलकम’ या लोकप्रिय कॉमेडी चित्रपटात त्यांनी उदय शेट्टी या डॉनची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील “भगवान का दिया सब कुछ है, दौलत है, शोहरत है, इज्जत है”, “कंट्रोल… उदय, कंट्रोल!” आणि “क्या करू इसका मार भी तो नहीं सकता प्यार जो करता है मुझसे” हे संवाद प्रेक्षकांच्या आजही तोंडपाठ आहेत.

त्याचप्रमाणे, 1997 मधील ‘यशवंत’ या चित्रपटात त्यांनी एका धडाडीच्या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका मांडली होती. यातील “एक मच्छर, साला एक मच्छर इंसान को आदमी से हिजडा बना देता है…” आणि “सौं में से अस्सी बेईमान, फिर भी मेरा देश महान” या ओळींनी त्या काळात मोठी लोकप्रियता मिळवली होती.

अभिनय क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल तसेच सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. भारत सरकारने 2013 मध्ये त्यांना कला क्षेत्रातील कामगिरीसाठी ‘पद्मश्री’ या चौथ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले आहे. याशिवाय त्यांनी आपल्या कारकिर्दीत 3 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील पटकावला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानावर मध्यरात्री दगडफेक; तीन तरुण पोलिसांच्या ताब्यात

Friday, 13 November 2026, 7:51

महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार? 13 नोव्हेंबरला पुणे-मुंबईसह राज्यातील हवामान कसे राहणार? वाचा ताजा अंदाज

Friday, 13 November 2026, 7:40

Daily Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्याचा दिवस! 13 नोव्हेंबरला ‘या’ राशींचे नशीब चमकणार, कोणाला मिळणार आनंदाची बातमी? वाचा

Friday, 13 November 2026, 7:32

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी समाधान पवार यांची नियुक्ती; प्रदीप पवार, शशिकांत चव्हाण यांच्यासह सहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Friday, 13 November 2026, 7:21

मराठा तरुणांसाठी जरांगेंचा मोठा निर्णय! हेल्पलाईन क्रमांक जारी, थेट केलं आवाहन

Thursday, 12 November 2026, 23:00

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! रब्बी पीक विमा नोंदणी सुरू; 31 मार्चपर्यंत संधी, पाहा कोणत्या पिकांसाठी किती मुदत?

Thursday, 12 November 2026, 22:25
Next Post

फ्रीडम पार्कमध्ये ध्रुव राठींची एंट्री, प्रकाश राजचा आक्रमक इशारा; ज्ञानेश कुमारांविरोधात बंगळुरूत मोठं आंदोलन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp