Friday, October 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फ्रीडम पार्कमध्ये ध्रुव राठींची एंट्री, प्रकाश राजचा आक्रमक इशारा; ज्ञानेश कुमारांविरोधात बंगळुरूत मोठं आंदोलन

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 8 October 2026, 9:11

बंगळुरू: मतदार यादीतील कथित अनियमितता आणि SIR प्रक्रियेच्या मुद्द्यावरून कॉकरोच जनता पार्टीने (CJP) बंगळुरूमध्ये आंदोलनाचे आयोजन केले आहे. 8 ऑक्टोबर 2026 रोजी फ्रीडम पार्क येथे ‘चप्पल आंदोलन’ आणि ‘पीपल्स ट्रिब्युनल’ आयोजित करण्यात आले. या आंदोलनात युट्युबर ध्रुव राठी सहभागी झाले आहेत. अभिनेता प्रकाश राज यांनीही या आंदोलनाला उपस्थिती लावली आहे.

CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. मतदार यादीच्या पुनरावलोकन प्रक्रियेत काही नागरिकांची नावे चुकीच्या पद्धतीने वगळली गेल्याचा आरोप CJP कडून करण्यात आला आहे. या मुद्द्यावर नागरिक आणि कथित प्रभावित मतदारांची बाजू ऐकून घेण्यासाठी पीपल्स ट्रिब्युनलचे आयोजन करण्यात आले आहे.

ध्रुव राठी यांच्या सहभागामुळे बंगळुरूतील आंदोलनाकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे. प्रकाश राज यांनी याआधी सोशल मीडिया पोस्टद्वारे राठी हे आंदोलनातील ‘विशेष पाहुणे’ असतील, अशी माहिती दिली होती. त्यानंतर राठी यांच्या सहभागाची अधिकृत घोषणा करण्यात आली.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रकाश राज यांनी एका व्हिडीओमधून नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर निशाणा साधत, “आली रे आली, ग्यानू तुझी बारी आली,” असा इशारा दिला. हा त्यांचा आंदोलनाच्या संदर्भातील राजकीय वक्तव्याचा भाग होता.

 

दरम्यान, CJP ने 10 ऑक्टोबर 2026 रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे पुढील आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनासाठी दिल्ली पोलिसांना लेखी माहिती देण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. या आंदोलनात CJP सोबत विविध विद्यार्थी संघटनाही सहभागी होणार असल्याचे वृत्त आहे.

जंतर-मंतरवरील आंदोलनात ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याबरोबरच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सुधारणांचा मुद्दाही उपस्थित केला जाणार आहे. त्यामुळे 10 ऑक्टोबरच्या आंदोलनाकडे आता राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

इंदापूरात उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने तरुणाला काठी-लोखंडी पाइपने मारहाण

Thursday, 8 October 2026, 20:58

पूनावाला ग्रुपच्या खासगी गाड्यांवर पोलिसांसारखे लाल-निळे फ्लॅशर; क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अमोल तुपे यांच्या तक्रारीनंतर कारवाई

Thursday, 8 October 2026, 20:29

परवानगी न घेता ‘न्याती इवोक’चे जाहिरात फलक लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Thursday, 8 October 2026, 19:07

पोलिसांची उद्घोषणा; विद्यार्थी ठाम! एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाचा तिढा कायम; मागण्या मान्य होईपर्यंत माघार न घेण्याची भूमिका

Thursday, 8 October 2026, 19:04

इंदापूर तालुक्यातील चिंदादेवी गावाजवळ मोटारसायकल घसरून व्यक्तीचा मृत्यू

Thursday, 8 October 2026, 18:43

शाळेचे ऋण फेडण्यासाठी माजी विद्यार्थ्याने लाखो रुपयांचे एआय डिजिटल पॅनल दिलं भेट

Thursday, 8 October 2026, 17:41
Next Post

अचानक हृदयविकाराचा झटका अन् नाना पाटेकरांची 45 मिनिटे मृत्यूशी झुंज… शेवटच्या क्षणी काय घडलं? वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp