Jalna News: जालना शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आज सकाळी एका शाळकरी विद्यार्थींनीने शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या (Student Suicide) केली. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसत आहे. (Jalna News)

मिळालेल्या माहितीनुसार, इयत्ता आठवीत शिकणाऱ्या १३ वर्षाच्या विद्यार्थीनीने शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. मृत विद्यार्थिनीचे नाव आरोही दीपक बिडलान असे होते. नेहमी प्रमाणे आरोही शाळेत गेली. प्रार्थना झाल्यानंतर सर्व जण आपल्यावर्गात गेले परंतु आरोही थेट तिसऱ्या मजल्यावर गेली. तिसऱ्या मजल्यावरून तीनं उडी मारून आत्महत्या केली.
ही घटना शिक्षकांना कळताच, घटनास्थळी धाव घेतली आणि आरोहीला रक्तंबबाळ अवस्थेत पाहताच ओरडाओरड सुरु केली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचार सुरु होण्याआधीच आरोहीचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले. आरोहीच्या पालकांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांना माहिती मिळताच, घटनेची नोंद घेतली.
पोलिसांनी तपास सुरु करत शाळेतील सर्व शिक्षकांची आणि मुख्यध्यापकांची चौकशी करण्यात आली. आरोहीच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केली. काही दिवसांपासून शाळेतील काही विद्यार्थी त्यांची मुलगीला त्रास देत होते. या त्रासाची तक्रार आरोहीने शिक्षकांकडे केली होती, मात्र शिक्षकांनी तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आणि त्यांच्या वागणुकीमुळेच मुलगी आत्महत्येस प्रवृत्त झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी या प्रकरणात संबंधित शिक्षक व विद्यार्थ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
यासंदर्भात शाळेचे मुख्याध्यापकांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून पोलीस या प्रकरणाकडे बारकाईने लक्ष देत आहे.







