Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नसरापूर–वेल्हे मार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 25 July 2026, 16:54

विशाल शिंदे

पुणे : नसरापूर–वेल्हे मार्गावरील रस्त्यांची दुरवस्था पुन्हा एकदा गंभीर बनली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. काही महिन्यांपूर्वी या मार्गावरील खड्डे भरल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले होते. त्यामुळे पहिल्याच पावसात अनेक ठिकाणचे खड्डे पुन्हा उखडून रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे.

यापूर्वीही या विषयावर वारंवार बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. रस्त्यावरील वाढत्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याचा धोका वाढल्याची बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. त्यानंतर काही काळ पावसाने उघडीप दिली होती. तो कालावधी रस्त्यांची योग्य दुरुस्ती करण्यासाठी अनुकूल असतानाही विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

 

स्थानिकांच्या मते, खड्डे भरताना त्यामधील चिखल, माती व सैल खडी न काढता थेट डांबर टाकण्यात आले. त्यावर मोठे दगड व खडी टाकून काम पूर्ण केल्याचे दाखवण्यात आले. या निकृष्ट कामाबाबत काही ठिकाणी नागरिकांनी कामही रोखले होते आणि दर्जेदार दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र, त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आले नाही.

सध्या भोर तालुक्यात मुसळधार पाऊस व जोरदार वारे सुरू असल्याने रस्त्यावरील खड्ड्यांची संख्या आणि खोली दोन्ही वाढल्या आहेत. नसरापूर परिसरात अनेक ठिकाणी गुडघाभर खड्डे पडले असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना मोठा धोका निर्माण झाला असून, या खड्ड्यांमुळे अनेक लहान-मोठे अपघात घडल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, पावसाचा जोर आता काही प्रमाणात कमी होत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरत्या स्वरूपात तरी खड्डे तातडीने भरावेत. अन्यथा भविष्यात एखादा गंभीर अपघात किंवा जीवितहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील.

नसरापूर–वेल्हे मार्ग हा अनेक गावांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता असून, दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, शेतकरी आणि व्यापारी या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दर्जेदार दुरुस्ती करून नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

माळशेज घाटात थरारक दुर्घटना! तब्बल १०० मीटर रस्ता ५ ते ६ फूट खाली खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 26 July 2026, 20:16

बारामतीत अपघाताचा थरार! हादरली! भरधाव ट्रकच्या धडकेत सख्ख्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू

Sunday, 26 July 2026, 19:54

‘म्हणून मी अभिजित दीपिकेच्या कुटुंबीयांची भेट घेतली” संजय शिरसाट यांनी स्पष्टंच सांगितलं; म्हणाले “आता त्याला यश मिळालं…

Sunday, 26 July 2026, 19:12

मोठ्या कंपनीत नोकरी करण्याचं स्वप्न पडलं महागात! मोबाईलवर ‘तो’ एक मेसेज आला अन् सगळंच झालं उध्वस्त…

Sunday, 26 July 2026, 18:34

‘आता नंबर गडकरींचा! राजीनामा झालाच पाहिजे” इथेनॉलवरून वाद पेटला; हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ…

Sunday, 26 July 2026, 18:07

“दोन महिन्यांत पैसे परत देईन, नाहीतर घर घेऊन देईन!” आश्वासन देत नंतर केली फसवणूक; खोट्या अपघाताचं नाटक केलं अन्…

Sunday, 26 July 2026, 17:50
Next Post

दुष्काळी पट्ट्यासाठी वरदान! कृष्णा नदीचे पाणी नीरा नदीसह उजनी धरणात वळवणार, सर्वेक्षणासाठी 24 कोटी मंजूर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.