Friday, October 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे जिल्ह्यात लॉजच्या आड देहविक्रीचा खुलेआम ‘धंदा’? ‘हप्ता’वसुलीच्या चर्चेने पुणे ग्रामीण पोलिसांवर गंभीर प्रश्नचिन्ह; एसपी गिल कारवाई करणार का?

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 4 October 2026, 13:43

पुणे : पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रात 34 पोलिस ठाण्यांचा समावेश असून, त्यात सायबर पोलिस ठाण्याचाही समावेश आहे. जिल्ह्यातून पुणे-सातारा, पुणे-सोलापूर, पुणे-नाशिक, पुणे-अहिल्यानगर आणि पुणे-मुंबई या प्रमुख महामार्गांसह पुणे-सासवड आणि पुणे-मुळशी हे महत्त्वाचे मार्ग जातात. या महामार्ग आणि राज्यमार्गालगत गेल्या काही वर्षांत लॉजिंग व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, याच लॉजिंग व्यवसायाच्या आड काही ठिकाणी देहविक्रीचा खुलेआम गोरख धंदा सुरु आहे. अशी नागरिकांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. त्यामुळे जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

उरुळी कांचन, यवत, दौंड, भिगवण, जेजुरी, रांजणगाव एमआयडीसी, शिक्रापूर, राजगुरुनगर आणि नारायणगाव या नऊ पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील काही लॉजमध्ये देहविक्रीचा गोरख धंदा सुरु आहे. या ठिकाणी ग्राहकांकडून कथितपणे एक ते दीड हजार रुपयांपर्यंत रक्कम घेतली जाते. एवढेच नव्हे, तर काही लॉजमधून पोलिसांना कथितपणे दरमहा मोठ्या रकमेचा ‘हप्ता’ दिला जात आहे. अशी नागरिकांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.

एका पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाच-पाच लॉज; मग ‘माया’ जाते कुठे?

काही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत किमान पाच किंवा त्यापेक्षा अधिक लॉज असल्याचे सांगितले जाते. या लॉजमध्ये गैरप्रकार सुरू असल्याच्या तक्रारी होत असतील, तर त्यांची नियमित तपासणी होते का? छापे टाकले जातात का? गैरप्रकार आढळल्यानंतर कारवाई केली जाते का? आणि जर कारवाई होत नसेल, तर त्यामागचे कारण काय? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. काही लॉजमधून दरमहा मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्याचे दावे केले जात आहेत. त्यातून पोलिसांना कथितपणे ‘हप्ता’ दिला जात असल्याची चर्चा असेल, तर हा पैसा नेमका कुठे जातो, याची चौकशी होणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

 

विशेष म्हणजे, काही मोजकी पोलिस ठाणी वगळता जिल्ह्यातील अन्य अनेक पोलिस ठाण्यांच्या हद्दीतही लॉजच्या आड अशाच प्रकारचे गैरप्रकार सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ही केवळ एखाद्या-दोन ठिकाणांची समस्या आहे की संपूर्ण जिल्ह्यातील यंत्रणेसमोरचे मोठे आव्हान आहे, हे तपासातून स्पष्ट होणे गरजेचे आहे.

फोटो दाखवून ‘व्यवहार’ ठरतो?

काही ठिकाणी ग्राहकांना महिलांचे फोटो दाखविले जातात. त्यानंतर ग्राहकाची पसंती झाल्यास काही वेळ प्रतीक्षा करण्यास सांगितले जाते आणि संबंधित महिलेला रिक्षा किंवा अन्य वाहनातून लॉजमध्ये आणले जाते,जर तपासात एखाद्या लॉजमध्ये देहविक्रीचा प्रकार सुरू असल्याचे निष्पन्न झाले, तर केवळ लॉजचालकांवर कारवाई करून भागणार नाही. अशा प्रकारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले का, कोणाकडून संरक्षण मिळाले का, याचीही चौकशी होणे आवश्यक आहे.

‘हप्ता’ कोणाच्या खिशात?

लॉजमधून पोलिसांना दररोज किंवा दरमहा ठराविक रक्कम दिली जात असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये असल्याचे सांगितले जाते. काही लॉजमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार होत असल्याचेही दावे केले जात आहेत. मात्र, कथित ‘हप्ता’वसुलीबाबत ठोस पुरावे अथवा अधिकृत नोंद अद्याप समोर आलेली नाही. ‘जर हे प्रकार खरे असतील, तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेला गैरप्रकार संबंधित पोलिस ठाण्यांच्या निदर्शनास कसा येत नाही?’ हा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या आरोपांची वरिष्ठ पातळीवरून स्वतंत्र चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याची मागणी होत आहे.

लॉजची तपासणी होते तरी किती?

काही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एकापेक्षा अधिक लॉज आहेत. या लॉजमध्ये नियमित तपासणी केली जाते का, अभ्यागतांच्या नोंदी तपासल्या जातात का, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले जाते का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. देहविक्रीविरोधी कायद्यांतर्गत मागील काही काळात किती कारवाया करण्यात आल्या? किती गुन्हे दाखल झाले? किती लॉज किंवा संबंधित आस्थापनांवर कारवाई झाली? याची आकडेवारी पोलिस प्रशासनाने जाहीर करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

पंकज देशमुखांच्या कारवाईची आठवण; आता गिल यांच्या भूमिकेकडे लक्ष

तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात विविध कारवाया झाल्याची चर्चा होती. त्यानंतर बढतीमुळे त्यांची बदली झाली. त्यांच्या जागी पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या परिमंडळ क्रमांक एकमध्ये कार्यरत असलेले संदीपसिंह गिल यांची पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाली.

पुणे शहर पोलिस दलात कार्यरत असताना गिल यांनी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला होता. मात्र, त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात अवैध दारूविक्री, मटका-जुगार, गांजा आणि देहविक्रीसारखे गैरप्रकार वाढल्याचा आरोप काही नागरिकांकडून केला जात आहे. या आरोपांची स्वतंत्र पडताळणी होणे आवश्यक आहे. दरम्यान, त्यांच्या कार्यकाळात काही पोलिस अधिकारी आणि कर्मचारी लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत अडकल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, या घटनांचा आणि जिल्ह्यातील कथित अवैध धंद्यांचा थेट संबंध असल्याचा निष्कर्ष केवळ या घटनांच्या आधारे काढता येणार नाही.

एसपी गिल कारवाई करणार का?

लॉजच्या आड देहविक्रीचे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी आणि चर्चा होत असतील, तर वरिष्ठ पातळीवरून त्याची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणण्याची गरज आहे. संबंधित लॉजची अचानक तपासणी करून गैरप्रकार आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई होणार का? तसेच अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाणार का, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. देहविक्रीच्या कथित गैरप्रकारांना कोणाचे संरक्षण आहे? ‘हप्ता’वसुलीच्या आरोपांची चौकशी होणार का? आणि पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल जिल्हाभर विशेष तपासणी मोहीम राबवून या चर्चांना पूर्णविराम देणार का? याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, ‘लॉजच्या आड गैरप्रकार सुरू असल्याच्या तक्रारी होत असतील, तर पोलिस प्रशासनाला याची माहिती का मिळत नाही?’ हा सवाल सध्या पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यपद्धतीसमोर उभा राहिला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

इंदापूरात उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने तरुणाला काठी-लोखंडी पाइपने मारहाण

Thursday, 8 October 2026, 20:58

पूनावाला ग्रुपच्या खासगी गाड्यांवर पोलिसांसारखे लाल-निळे फ्लॅशर; क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अमोल तुपे यांच्या तक्रारीनंतर कारवाई

Thursday, 8 October 2026, 20:29

परवानगी न घेता ‘न्याती इवोक’चे जाहिरात फलक लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Thursday, 8 October 2026, 19:07

पोलिसांची उद्घोषणा; विद्यार्थी ठाम! एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाचा तिढा कायम; मागण्या मान्य होईपर्यंत माघार न घेण्याची भूमिका

Thursday, 8 October 2026, 19:04

इंदापूर तालुक्यातील चिंदादेवी गावाजवळ मोटारसायकल घसरून व्यक्तीचा मृत्यू

Thursday, 8 October 2026, 18:43

शाळेचे ऋण फेडण्यासाठी माजी विद्यार्थ्याने लाखो रुपयांचे एआय डिजिटल पॅनल दिलं भेट

Thursday, 8 October 2026, 17:41
Next Post

भाजपच्या पुणे पदवीधारच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आहेत कोण? काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याशी आहे खास नातेकाँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याशी आहे खास नाते

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp