Saturday, September 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

IndiGo : विमान प्रवाशांची ‘लूट’ थांबणार! इंडिगो-एअर इंडियाची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी २ नवीन कंपन्यांची एन्ट्री; तिकीट दर होणार स्वस्त!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 24 December 2025, 19:51
IndiGo

photo- social media

IndiGo : देशांतर्गत विमान वाहतूक क्षेत्रात सध्या एकाधिकारशाही गाजवणाऱ्या मोठ्या कंपन्यांना आता जोरदार टक्कर मिळणार आहे. इंडिगोसारख्या बड्या विमान कंपनीच्या फ्लाईट्स अचानक रद्द झाल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर, प्रवाशांना प्रवासाचे अधिक सक्षम पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने दोन नवीन विमान कंपन्यांना भारतात सेवा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना सवलतीच्या दरात प्रवास आणि चांगल्या सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (IndiGo)

दोन कंपन्यांना ‘NOC’ जारी; तिसरीही तयारीत

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात ‘अल हिंद एअर’ आणि ‘फ्लायएक्सप्रेस’ या दोन कंपन्यांना ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) देण्यात आले आहे. यासोबतच ‘शंख एअर’ ही कंपनीदेखील लवकरच आपली उड्डाणे सुरू करणार आहे. सध्या विमान वाहतूक बाजारात इंडिगोचा वाटा तब्बल ६५ टक्के असून, एअर इंडियासोबत त्यांचे वर्चस्व आहे. मात्र, आता नव्या कंपन्यांच्या प्रवेशामुळे प्रवाशांना केवळ एकाच कंपनीवर अवलंबून राहावे लागणार नाही.

स्पर्धा वाढल्याने सर्वसामान्यांना होणार फायदा

जेव्हा बाजारात स्पर्धा कमी असते, तेव्हा विमान कंपन्यांकडून तिकीट दर वाढवले जातात. आता नवीन कंपन्यांमुळे बाजारात निरोगी स्पर्धा निर्माण होईल. तज्ज्ञांच्या मते, यामुळे विमानाची तिकिटे स्वस्त होऊ शकतात आणि प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा दर्जाही सुधारेल. भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठेत किमान ५ मोठ्या विमान कंपन्या असणे गरजेचे आहे, त्यादृष्टीने सरकारने हे पाऊल उचलले आहे.

खर्चाचे गणित आणि पुढील आव्हाने

विमान कंपनी सुरू करणे सोपे असले तरी ती टिकवणे हे मोठे आव्हान असते. जेट इंधनाचे चढे दर आणि करांचा बोजा यामुळे कंपन्यांचा ऑपरेटिंग खर्च वाढतो. त्यामुळे सरकारने या तांत्रिक आणि आर्थिक बाबींकडे लक्ष द्यावे, अशी मागणी विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी केली आहे. ‘उडान’ योजनेमुळे प्रादेशिक कनेक्टिव्हिटी सुधारली असली, तरी या नवीन कंपन्यांमुळे मोठ्या शहरांमधील प्रवास अधिक सुखकर आणि परवडणारा होणार आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मोठं यश! विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत सरकारकडून महत्त्वाचा निर्णय जाहीर

Friday, 4 September 2026, 22:53

अभिजीत दिपकेंचं नवं टार्गेट ठरलं! धर्मेंद्र प्रधानांनंतर आता CJPची ‘या’ मुद्द्यावर मोठी मोहीम,नवी रणनीती काय?

Friday, 4 September 2026, 22:21

मावशी, साप आला!’ म्हणत 65 वर्षीय आजीचे दागिने लंपास; यवत पोलिसांनी सराईत चोरट्याला ठोकल्या बेड्या, आजीने मानले पोलिसांचे आभार..

Friday, 4 September 2026, 21:53

ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्यास मंडळावर कारवाई होणार ; पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर

Friday, 4 September 2026, 21:27

नागपुरात DJ बंदीला केराची टोपली! लेझरच्या रोषणाईत दणदणाटात दहीहंडी उत्सव; नियम धाब्यावर

Friday, 4 September 2026, 21:09

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! ऑगस्टचा ₹1,500 हप्ता ‘या’ तारखेनंतर खात्यात; मोठी अपडेट समोर

Friday, 4 September 2026, 19:46
Next Post
chhatrapati sambhajinagar

chhatrapati sambhajinagar : ठाकरे बंधूंच्या युतीला छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरुंग; मनसे जिल्हाध्यक्षांचा 'जय महाराष्ट्र' करत शिंदे गटात प्रवेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp