Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गाजली कारवाई….पण पंधरा दिवस उलटूनही गुन्हा नाही; गगनगिरी मिल्क प्रकरणात नेमकं दडलंय काय?

योगेश मारणेby योगेश मारणे
Sunday, 12 July 2026, 14:16

न्हावरे : पारोडी(ता.शिरूर)येथील गगनगिरी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट या कंपनीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने २६ जून रोजी धडक कारवाई केली.त्यानंतर तब्बल १२ हजार लिटर संशयास्पद भेसळ युक्त दूध नष्ट केले.डेअरीला सील ठोकले आणि परवाना निलंबित केल्याची माहिती दिली.या कारवाईची राज्यभर चर्चा झाली.मात्र,या कारवाईला आता सुमारे पंधरा दिवस उलटूनही संबंधित जबाबदार व्यक्तींवर नेमकी कोणती कायदेशीर कारवाई करण्यात आली.याचा खुलासा अन्न व औषध प्रशासनाने केलेला नाही.त्यामुळे या कारवाईबाबत अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

कारवाईवेळी दुधाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता,दूध नमुन्यांचा तपासणी अहवाल येण्यासाठी साधारणपणे एक महिन्याचा कालावधी लागतो.अंतिम अहवाल आल्यानंतरच संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे त्यांनी स्पष्ट केले.

मात्र,नागरिकांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे की,जेव्हा अंतिम अहवाल अद्याप आलेलाच नाही.तेव्हा मोठ्या कारवाईचा गाजावाजा करण्यात आला;पण त्यानंतरच्या प्रक्रियेबाबत कोणतीही स्पष्ट माहिती का देण्यात आली नाही? यामुळे ही कारवाई केवळ प्रसिद्धीपुरती होती का,असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे,शिरूर तालुक्यात दूध संकलन केंद्रे,डेअऱ्या,बेकऱ्या तसेच दुधावर प्रक्रिया करून विविध दुग्धजन्य पदार्थ तयार करणारे अनेक उद्योग मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत.मात्र,अशा इतर आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाने अलीकडच्या काळात किती तपासण्या केल्या.किती नमुने घेतले आणि किती कारवाया केल्या, याबाबत कोणतीही सविस्तर माहिती समोर आलेली नाही.त्यामुळे कारवाईची व्याप्ती केवळ एका कंपनीपुरतीच मर्यादित का राहिली? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

माहितीनुसार,गगनगिरी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट कंपनीकडे दररोज सुमारे १० हजार लिटर दूध संकलन होत होते.कंपनीकडून प्रामुख्याने मुंबईसह विविध ठिकाणी दूध पुरवठा केला जात होता.अशा परिस्थितीत, जर प्रत्यक्षात दुधामध्ये भेसळ आढळली असेल,तर हा प्रकार केवळ एका डेअरीपुरता मर्यादित आहे की, त्यामागे मोठे जाळे कार्यरत आहे. याचाही सखोल तपास होणे आवश्यक असल्याची मागणी व्यक्त होत आहे.

दुसरीकडे,जर प्रयोगशाळेच्या अंतिम अहवालात दूध सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले.तर तेही तितक्याच पारदर्शकपणे जनतेसमोर मांडणे आवश्यक आहे.त्यामुळे अंतिम सत्य काय आहे.भेसळ होती की नव्हती, दोषी कोण आणि पुढे काय कारवाई होणार,याबाबत अन्न व औषध प्रशासनाने अधिकृत भूमिका जाहीर करावी.अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.सध्या या प्रकरणात सर्वांचे लक्ष प्रयोगशाळेच्या अहवालाकडे लागले असून,त्यानंतर प्रशासन नेमकी कोणती कायदेशीर कारवाई करते यावरच या संपूर्ण कारवाईची विश्वासार्हता अवलंबून राहणार आहे.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईनला मोठी गळती! दुर्गंधीने परिसरात खळबळ; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Saturday, 29 August 2026, 23:14

मोठी बातमी! मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक भरती परीक्षा रद्द; नव्या तारखेची लवकरच घोषणा

Saturday, 29 August 2026, 22:54

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय! 17 दिवसांच्या उपोषणानंतर सरकार झुकलं; धडाधड GR जारी

Saturday, 29 August 2026, 22:39

धबधब्यावरचा आनंद ठरला अखेरचा!पाय घसरला अन् तरुणी वाहून गेली; दुर्दैवी मृत्यू

Saturday, 29 August 2026, 21:39

पोल्ट्री आणि पशुपालकांच्या न्याय्य हक्कासाठी 1 सप्टेंबरला पुण्यात मूक मोर्चा: GR असूनही अंमलबजावणी का नाही?

Saturday, 29 August 2026, 21:24

खाजगी क्लासला फाटा; स्व-अभ्यासाच्या जोरावर ऋषिकेश बेंद्रे राज्यात प्रथम!

Saturday, 29 August 2026, 20:16
Next Post

'पती शरीरसंबंध ठेवण्यास असमर्थ" गिरीजा राऊत यांचा धक्कादायक खुलासा; म्हणाल्या 'माझा अघोरी छळ केला....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp