Viral Video: एका तरुणाला मस्ती करणं चांगलंच भोवले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Viral) व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने वाघाचा पोशाख परिधान करून वाघांसोबत प्रँक करण्याचा प्रयत्न केला, पण काही क्षणांतच ही गंमत त्याच्याच जिवावर बेतण्याची वेळ आली. (Latest Viral Video)

व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, एक माणूस वाघाचं वेषांतर करून जंगलात फिरत होता. जंगलात तो अगदी वाघाच्या जवळ गेला. सुरुवातीला वाघ त्याच्याकडे कुतूहलाने पाहतात. त्यांच्या हालचालींत एक प्रकारचा गोंधळ आणि उत्सुकता दिसून येते, जणू त्यांना वाटतंय की त्यांच्या समोर खरंच आणखी एक वाघ उभा आहे. काही वेळाने मात्र एका वाघाने जवळ जाऊन त्याचा वास घेतला. त्याला काहीतरी संशय आला. तो हळूहळू त्या माणसाच्या जवळ येतो आणि त्याचा वास घेऊ लागतो. काही क्षणांतच वाघाला वास्तव समजतं आणि तो अचानक त्या व्यक्तीवर हल्ला करतो.
पहा व्हिडिओ
“ don’t get involve in crypto, its too risky “
crypto guys : pic.twitter.com/N3OEoykl1w
— naiive (@naiivememe) November 11, 2025
वाघाच्या हल्ल्यानंतर तो माणूस घाबरून पळायला लागला, पण वाघ त्याचा पाठलाग करताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओनंतर नेटकऱ्यांनी या तरुणाला चांगलेच सुनावले आहे. अश्या प्रकारच्या जीवघेणे स्टंट करू नये असे काही नेटकऱ्यांनी व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. तर एकाने या व्हिडिओवर अशी कंमेट केली आहे की, हा व्हिडिओ एआय ने बनवला आहे.





