Sunday, November 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फोन कॉल्स, चीन-रशियाचा दबाव अन् पाकिस्तानची मध्यस्थी! अमेरिका-इराण युद्धविरामाची ‘इनसाइड स्टोरी’ उघड; मध्यरात्री असं काय घडलं?

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 8 April 2026, 12:47

तेहरान: गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगाचा श्वास रोखून धरणाऱ्या अमेरिका आणि इराणमधील युद्धाला अखेर दोन आठवड्यांसाठी स्थगिती मिळाली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला उद्ध्वस्त करण्याचा इशारा दिल्यानंतर, अवघ्या काही तासांतच दोन्ही देशांनी ‘शस्त्रसंधी’ जाहीर केली. या निर्णयामुळे जागतिक महायुद्धाचे सावट तूर्तास टळले असून, या ऐतिहासिक घडामोडीमागे मोठी राजनैतिक खेळी असल्याचे समोर आले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या वीज प्रकल्पांवर भीषण हल्ले करण्याची धमकी दिली होती. मात्र,  मुदत संपण्यापूर्वीच ट्रम्प यांनी अनपेक्षितपणे युद्धविरामाची घोषणा केली. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून, दोन आठवड्यांसाठी लष्करी कारवाया थांबवण्यास संमती दर्शवली आहे.

शस्त्रसंधीची ‘इनसाइड स्टोरी’

युद्ध थांबवण्यासाठी पडद्यामागे वेगाने सूत्रे हलली. हल्ल्याची मुदत संपण्यापूर्वी ट्रम्प यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना फोन केला. त्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशीही चर्चा केली. असीम मुनीर यांनी इराणच्या लष्करी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. याच काळात चीन आणि रशियाने संयुक्त राष्ट्रात ‘होर्मुझ’ संबंधीचा ठराव फेटाळून लावत अमेरिकेवर दबाव निर्माण केला.

इराणच्या 10 अटी आणि भविष्यावर परिणाम

इराणने यासाठी अमेरिकेसमोर 10 कडक अटी ठेवल्या आहेत. यात होर्मुज सामुद्रधुनीवर इराणचे नियंत्रण कायम राखणे, युरेनियम संवर्धनास परवानगी, इराणवरील आर्थिक निर्बंध उठवणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पश्चिम आशियातून अमेरिकन सैन्याची माघार यांसारख्या अटींचा समावेश आहे.

इराणच्या ‘या’ अटी!

हा युद्धविराम केवळ तात्पुरता नसून इराणने अमेरिकेसमोर अत्यंत कडक अटी ठेवल्या आहेत. या अटींमुळे जागतिक राजकारणाची समीकरणे बदलणार आहेत:

1. अहिंसा: दोन्ही देशांनी यापुढे लष्करी बळाचा वापर न करण्याचे आश्वासन दिले आहे.

2. होर्मुजवर इराणचेच राज्य: जागतिक इंधन व्यापारासाठी महत्त्वाच्या असलेल्या होर्मुज सामुद्रधुनीवर इराणचे नियंत्रण कायम राहील.

3. युरेनियम संवर्धन: इराणला युरेनियम संवर्धनाची परवानगी असेल.

4. निर्बंधांतून मुक्ती: इराणवरील सर्व प्राथमिक आणि दुय्यम आर्थिक निर्बंध तातडीने संपवले जातील.

5. संयुक्त राष्ट्रांचे ठराव: इराणविरोधी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि गव्हर्नर्स बोर्डाच्या सर्व ठरावांची अंमलबजावणी थांबवली जाईल.

6. नुकसानभरपाई: गेल्या काही दिवसांत झालेल्या नुकसानीसाठी अमेरिका इराणला भरपाई देणार.

7. अमेरिकन सैन्याची माघार: पश्चिम आशियातील अमेरिकेचे सैन्य मागे घेतले जाईल.

8. हिझबुल्लाह आणि लेबनॉन: लेबनॉनमधील हिझबुल्लाहविरुद्धच्या युद्धासह सर्व संघर्षांवर तात्काळ युद्धविराम केला जाईल.

हा दोन आठवड्यांचा काळ जागतिक अर्थव्यवस्थेसाठी आणि विशेषतः इंधन दरांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल. जर इस्लामाबादमधील चर्चेतून कायमस्वरूपी तोडगा निघाला, तरच आशियातील शांतता टिकून राहील. सध्या या युद्धविरामामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत घट होण्याची शक्यता असून भारतासारख्या देशांना मोठा दिलासा मिळू शकतो.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

सिल्व्हर ओकवर राजकीय खलबतं! पार्थ पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांची बड्या नेत्यांसोबत दोन तासांपासून बंद दाराआड चर्चा

Saturday, 7 November 2026, 21:52

अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडली! ‘KBC’चे शूटिंग थांबले, बिग बींच्या प्रकृतीबाबत चाहत्यांमध्ये चिंता

Saturday, 7 November 2026, 20:57

पायल झांबरे प्रकरणात मोबाईल उघडणार गूढ? ‘चौथा आरोपी’ कोण, पतीसह तिघांची कोठडी वाढवली!

Saturday, 7 November 2026, 20:08

डकवर्थ-लुईसचा खेळ अन् किवींचा पराभव! टीम इंडियाने वर्षभरात 11 वेळा न्यूझीलंडला चारली धूळ

Saturday, 7 November 2026, 19:45

पुणे जिल्हा परिषद शाळांमध्ये दिवाळी पाडव्याला भरणार माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

Saturday, 7 November 2026, 19:30

पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत परिसरातील पथदिवे अखेर पुन्हा प्रकाशले!

Saturday, 7 November 2026, 19:13
Next Post

यवत येथील सुप्रसिद्ध डॉ. श्याम कुलकर्णी यांचे आकस्मिक निधन; माणसातील देवदूत हरपला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp