सोलापूर : सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. तब्बल १५ वर्षांनंतर सोलापूरवरून विमा सेवा सुरु करण्यात आली आहे. सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात, जिंकून आल्यानंतर पहिल्यांदा विमानतळाचा प्रश्न सोडवेल असे आश्वासन दिले होते. त्यांनी आपले हे आश्वासन आता पूर्ण करून दाखवले आहे.

प्रदीर्घ काळानंतर अखेर आज सकाळी 7.20 च्या सुमारास विमानाने गोवा येथून सोलापूर विमानतळावर उड्डाण केले. आजपासून सोलापूर-गोवा विमानसेवा सुरू झाली असून, तुम्हाला सोलापूर विमानतळावरुन थेट गोव्याला जाणं शक्य होणार आहे.
गोवा-सोलापूर फ्लाईटचा टाईम काय असेल?

गोवा येथून सकाळी 7.20 वाजता सोलापूरसाठी विमान उड्डाण घेईल. त्यानंतर 8.30 वाजता सोलापूर विमानतळावर विमान लँड होईल. सकाळी 8.50 ला सोलापूरहून विमान गोव्यासाठी उड्डाण घेईल. 10.15 वाजता गोवा विमानतळावर विमान उतरणार आहे. ही वेळ सोमवार ते शुक्रवार दरम्यान निश्चित करण्यात आली आहे.

तर शनिवार आणि रविवारी टाईमटेबल बदलेल. या दोन दिवशी गोवा येथून सायंकाळी 4.05 वाजता सोलापूरसाठी विमान उड्डाण घेईल. व 5.10 वाजता सोलापुरात विमान उतरणार आहे. त्यानंतर सायंकाळी 5.35 वाजता सोलापुरातून गोव्यासाठी विमान उड्डाण घेईल. 6.50 ला गोव्यात विमान लँड होईल.







