Monday, October 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुळशी मोजणी कार्यालयाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात शेतकऱ्याच्या कुटुंबाचा आमरण उपोषणाचा लढा

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 9 June 2025, 15:36

संदीप बोडके
मुळशी, ता. 9 : मुळशी, ता. 9 : पुणे जिल्ह्यामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासनाच्या वतीने ”महसूल अदालत” कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी सर्वसामान्य नागरिकांची रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले असून ते स्वत: आज सोमवारी (ता. 9) पुण्यात उपस्थित राहून आढावा घेत आहेत. मात्र दुसरीकडे मुळशी तालुक्यात मोजणी कार्यालयातून न्याय मिळत नसल्याने एका शेतकऱ्याच्या कुटुंबाला उपोषण करण्याची वेळ आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मुळशी तालुका मोजणी कार्यालयाचे उपअधिक्षक स्वप्ना पाटील यांच्या भूमी अभिलेख विभागाकडून मोजणी प्रकरणात योग्य न्याय मिळत नाही. सन 2006 साली कोर्ट कमिशनर मोजणीत हद्दी खुणा कायम झालेल्या आहेत. एकाच गट नंबरमध्ये वेगवेगळे मोजणी नकाशे तयार होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये वाद लावून देण्याचे काम मोजणी कार्यालय करत आहे. असा आरोप लवळे (राऊतवाडी, ता. मुळशी) येथील शेतकरी अरुण भिकोबा राऊत यांनी केला आहे.मोजणी कार्यालयाच्या चुकीच्या कारभाराच्या निषेधार्थ शेतकरी अरुण राऊत हे मुळशी तहसील कार्यालयासमोर आज सोमवारीपासून (ता . 9) आमरण उपोषणास बसले आहेत. त्यावेळी बोलताना वरील आरोप लवळे यांनी केला आहे .

मुळशी तालुक्यातील मोजणी कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे शेतकरी अरुण राऊत यांना वडिलोपार्जित घर गमावण्याची वेळ आली आहे. कोर्ट कमिशनर यांनी मोजणी केलेली असतानाच तसेच मोजणी कार्यालयाच्या मूळ रेकॉर्डकडे दुर्लक्ष करून, लगतधारक शेतकरी व मोजणी कार्यालयाच्या संगनमताने गटाची हद्द चुकीची दाखवल्याचा आरोप लवळे येथील शेतकरी अरुण राऊत यांनी पुणे प्राईम न्यूज शी बोलताना केला आहे.

मौजे लवळे राऊतवाडी (ता. मुळशी) येथे गट नंबर, 413 मध्ये तक्रारदार अरुण राऊत यांची वडिलोपार्जित शेती आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच गटात त्यांचे घर आहे. गट नंबर 413 व गट नंबर 430 या गटाचा बांध हा पुर्व पश्चिम दिशेला सरळ आहे. त्याची नोंद ही शासकीय दफ्तरी नकाशात नमूद आहे. सन 2006 साली झालेल्या कोर्ट कमिशनर मोजणीतही हद्द व खुणा कायम झालेल्या आहेत. मात्र हे अभिलेख रेकॉर्ड डावलून मोजणी कार्यालय मुळशी हे गट नबंर 413 व गट नंबर 430 चा बांध हा नकाशात सरळ असतानाही तिरकस दाखवत आहे.

मोजणी कार्यालय मुळशीच्या या गलथान कारभारामुळे गट नंबर 413 येथे चाळीस वर्षापासूनचे रहाते घर हे शेजारील गट नंबर 430 मध्ये दाखवत आहे. लगतधारक व मोजणी कार्यालयातील भूकरमापक व अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे शासकीय दफ्तर व रेकॉर्ड डावलून चुकीच्या मोजणीच्या हद्दी खुणा दाखवण्याचे काम मोजणी कार्यालय करत असल्याचा आरोप राऊत यांनी पुणे प्राईम न्यूज शी बोलताना केला आहे.

दरम्यान, शेतकरी राऊत यांची मागणी नसताना परस्पर त्यांचे मोजणीचे प्रकरण भोर उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडे वर्ग केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे मुळशी भूमी अभिलेख विभागातील कारभार प्रकाशझोतात आला आहे.

सन 2006 साली कोर्ट कमिशनर मोजणी झालेली आहे. त्यानुसार हद्दी कायम आहेत. मात्र लगतधारक व मोजणी कार्यालय संगनमताने मोजणीचे मूळ रेकॉर्ड बदलायला निघाले आहेत. मुळशी मोजणी कार्यालयाचा मनमानी कारभार सुरू आहे. त्यामुळे माझे प्रकरण मुद्दामहून भोर तालुका मोजणी कार्यालयाकडे वर्ग केले आहे. 2006 साली झालेल्या मोजणीचे रेकॉर्ड भोरचे उपअधिक्षक विकास गोफणे यांना दिलेले आहे. प्रशासनाकडून आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी व माझे कुंटूब आमरण उपोषणाला बसणार आहे .              -अरुण राऊत (शेतकरी)

शेतकरी अरुण राऊत यांची मुळशी भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांविषयी तक्रार होती. त्यामुळे वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार त्यांचे प्रकरण भोर ला वर्ग केले आहे. नियमानुसार त्या प्रकरणात योग्य ती कारवाई भोर तालुका मोजणी कार्यालयाकडून होईल. तसेच संबंधित प्रकरण हे माझ्याकडे नसल्याने त्याबाबत बोलणे उचित ठरणार नाही.                                                                                                                            -स्वप्ना पाटील (उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय मुळशी)

मोजणी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यामुळे लवळे राऊतवाडी येथील मोजणी प्रकरणात 16 जून ला हद्दी खुणा दाखवण्यात येणार आहे. त्याबाबतची नोटीस संबंधित शेतकऱ्यांना पाठवली आहे.
  -विकास गोफणे (उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय भोर)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

वाहनधारकांनो सावधान! आता HSRP नंबर प्लेट नसेल तर थेट होणार कारवाई; प्रशासनाची विशेष तपासणी मोहीम सुरु

Monday, 26 October 2026, 16:06

पुण्यात काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना! जुन्नरमध्ये वीजपंपाचा शॉक लागून बाप-लेकाचा मृत्यू; परिसरात हळहळ

Monday, 26 October 2026, 16:04

चक्रीवादळाचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात 140 किमी वेगाने वाहणार वारे अन् मोठं संकट; महाराष्ट्रावर काय परिणाम होणार? वाचा

Monday, 26 October 2026, 15:54

इंस्टाग्रामचा मित्र डायरेक्ट तिच्या घरात घुसला, अपहरण करत गुजरातला नेऊन केलं नको ते कृत्य; बांधून ठेवलं, शरीराचे लचके तोडले अन्…

Monday, 26 October 2026, 14:50

बनावट ग्राहक, ५००च्या नोटा, पोलिसांना मिस कॉल देऊन इशारा; पोलिसांनी सापळा रचत प्लॅनिंग केलं अन् भोरच्या सेक्स रॅकेटचा झाला पर्दाफाश…

Monday, 26 October 2026, 14:45

पुण्यात भररस्त्यात तरुणीला पळवून नेण्याचा प्रयत्न! ‘माझ्या अंगाला हात लावून डायरेक्ट उचललं.. तरुणीने केला भयानक घटनेचा खुलासा; पहा Video

Monday, 26 October 2026, 14:40
Next Post

थेऊर येथे महिंद्रा एक्सयुव्ही, बलेनो कार व मोटार सायकलचा विचित्र अपघात; दोन सख्ख्या भावासह तिघेजन जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp