Monday, October 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अडीच ग्रॅम सोने; माणुसकी अमूल्य!अंधारात निर्माल्याच्या ढिगाऱ्यात मंगळसूत्राचा शोध; कचरावेचक अरविंद शिंदेंच्या प्रामाणिकपणाला सलाम

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 22 September 2026, 14:05

डॉ. अशोक बालगुडे

पुणे : अडीच ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र निर्माल्यासोबत चुकून कचरापेटीत गेले. समोर फुलांचा, पानांचा, हारांचा मोठा ढीग आणि त्यात अंधार. मंगळसूत्र कुठे गेले, याचा थांगपत्ताही नव्हता. मात्र, त्या अंधारात एका कचरावेचकाने बॅटरीच्या क्षीण प्रकाशात सुरू केलेला शोध अखेर माणुसकीचा उजेड ठरला.

पाषाणमधील वाकेश्वर घाट येथे गौरी-गणपतीच्या निर्माल्य संकलनादरम्यान ही घटना घडली. एका नागरिकाने गौराईला घातलेले मंगळसूत्र चुकून निर्माल्यासोबत कंटेनरमध्ये गेले. सुमारे 20 ते 25 मिनिटांनी ही बाब लक्षात आल्यानंतर संबंधित नागरिकाने संकलन केंद्राशी संपर्क साधला. तोपर्यंत कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माल्य जमा झाले होते. ही परिस्थिती पाहून अरविंद निवृत्ती शिंदे यांनी हार, फुले आणि पाने बाजूला करीत कंटेनरमध्ये उतरून शोध सुरू केला.

अंधार, वाढता निर्माल्याचा ढीग आणि मंगळसूत्र नेमके कुठे पडले याचा अंदाज नसतानाही त्यांनी प्रयत्न सोडला नाही. बराच वेळ शोध घेतल्यानंतर अखेर त्यांच्या नजरेस मंगळसूत्र पडले. त्यांनी ते काळजीपूर्वक बाहेर काढून संबंधित नागरिकाच्या स्वाधीन केले. मंगळसूत्र मिळाल्यानंतर नागरिकाच्या चेहऱ्यावर समाधान उमटले; मात्र या घटनेने त्याहून मोठे काही मिळवून दिले—विश्वास.
“नागरिक आमच्यावर विश्वास ठेवून निर्माल्य देतात; तो विश्वास जपणे ही आमची जबाबदारी आहे,” अशी भावना शिंदे यांनी व्यक्त केली.

 

आज सोन्याची किंमत बाजार ठरवतो; पण प्रामाणिकपणाची किंमत बाजारात ठरत नाही. अडीच ग्रॅम सोन्यासाठी घेतलेली ही धडपड केवळ हरवलेली वस्तू शोधण्याची नव्हती; ती एका अनोळखी नागरिकाचा विश्वास जपण्याची होती. निर्माल्याच्या ढिगाऱ्यात हरवलेले मंगळसूत्र सापडले; पण त्याहून मौल्यवान माणुसकीचा दागिना त्या दिवशी पुन्हा उजळला. अडीच ग्रॅम सोने हातात आले पण प्रामाणिकपणाचे मोल समाजाच्या मनात कोरले गेले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बारामतीत खळबळ! प्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवक राणा सूर्यवंशी यांच्यावर जीवघेणा हल्ला; गोळीबार अन् कोयत्याने सपासप वार

Sunday, 18 October 2026, 22:03

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार! दुचाकीवरून आलेल्या ३ जणांनी झाडल्या ७ गोळ्या; पहा धक्कादायक Video

Sunday, 18 October 2026, 20:38

टाटा ट्रस्ट्सचा ऐतिहासिक निर्णय! देशभरात उभारली जाणार ४० ते ५० नवीन रुग्णालये; गरिबांसाठी मोफत उपचार, ५ वर्षांचा मेगा प्लॅन जाहीर

Sunday, 18 October 2026, 20:18

पुण्यात प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा चौधरीसोबत भयानक प्रकार! जबरदस्ती कारमध्ये कोंबलं; कार्यक्रमाचे पैसे थकवले, म्हणाली “मला किडनॅप…

Sunday, 18 October 2026, 20:15

दौंडमध्ये चोरट्यांचा कारनामा! ‘यहाँ कोई संजय राऊत रहता है क्या?’ घराबाहेर झाडू मारणाऱ्या महिलेला विचारलं अन् क्षणात मंगळसूत्र हिसकावून पसार…

Sunday, 18 October 2026, 20:12

पुणेकरांनो सावधान! तुम्ही पिताय ते दूध खरोखरच शुद्ध आहे का? पुणे विभागात तब्बल ७८ टक्के भेसळयुक्त दूध जप्त

Sunday, 18 October 2026, 19:53
Next Post

पुण्यात अपघातात IT इंजिनीअरचा मृत्यू; लग्नाच्या काही आठवडे आधीच कुटुंबावर शोककळा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp