मुंबई: जगात (Gold Rate Today) गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चढ-उतारानंतर 8 डिसेंबर 2025 रोजी सोन्या-चांदीच्या दरांमध्ये किंचित घसरण दिसून आली आहे. 7 डिसेंबरच्या तुलनेत आज दरांमध्ये अगदी किरकोळ घट झाली असली तरी, बाजारात अस्थिरता कायम असल्याचे चित्र आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,30,140 रुपये नोंदवला गेला, जो मागील दिवसाच्या 1,30,150 रुपये दरापेक्षा 10 रुपयांनी कमी आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 1,19,290 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 9,760 रुपये या पातळीवर स्थिर राहिले.

यासोबतच, चांदीच्या दरातही किंचित घसरण दिसून आली आहे. 8 डिसेंबर रोजी चांदीचा भाव प्रति किलोग्रॅम 1,89,900 रुपये इतका नोंदवण्यात आला. 7 डिसेंबरच्या 1,90,000 रुपये प्रति किलोग्रॅम दराच्या तुलनेत चांदीचा भाव आज केवळ 100 रुपयांनी खाली आला आहे. गेल्या तीन दिवसांतील दरांची तुलना केल्यास, या बाजारातील तीव्र चढ-उतार स्पष्ट होतात. सलग तीन दिवसांच्या आकडेवारीवरून हे सिद्ध होते की, येत्या काळातही हिच अस्थिरतेची स्थिती राहण्याची शक्यता आहे.





