Wednesday, June 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हॉटेलच्या बाहेर उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्स बसमधून 10 तोळे सोन्याचे दागिने व रोख लंपास ; यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 24 June 2026, 12:06

यवत, (पुणे) : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाखारी (ता. दौंड) गावच्या हद्दीत असलेल्या ‘समाधान हॉटेल’च्या बाहेर उभी असलेली लक्झरी ट्रॅव्हल्स बस मधून 10 तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. प्रवाशाच्या पर्समधून तब्बल चालू भावाप्रमाणे 15 लाख 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 20 हजार रुपये असा मुद्देमाल चोरीला गेला आहे. शनिवारी (ता. 20) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास हा थरार घडला.

याप्रकरणी रिक्षाचालक दयानंद अभिमान सूर्यवंशी (वय 42 वर्षे, रा. जुनी सांगवी, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी यवत पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दयानंद सूर्यवंशी यांच्या सासऱ्यांची प्रकृती गंभीर असल्याने, त्यांची पत्नी, मुलगा, मेहुणी हे सर्वजण लाडूवंती (ता. बसवकल्याण, जि. बिदर, कर्नाटक) येथे जाण्यासाठी निघाले होते. त्यांच्याकडे एक नारंगी रंगाची मोठी पर्स होती, ज्याच्या आत ठेवलेल्या छोट्या पर्समध्ये कुटुंबाने आपले दागिने आणि रोख रक्कम सुरक्षित ठेवली होती.

 

शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ते औंध (पुणे) येथून हैदराबादला जाणाऱ्या ‘डॉल्फिन स्लीपर एसी ट्रॅव्हल्स’ (बस क्र. एम.पी. ०९ व्ही ३३०३) मध्ये बसले. रात्री 11 वाजता बसने शेवाळवाडी येथून आणखी प्रवासी घेतले आणि ती सोलापूर हायवेने मार्गस्थ झाली. मध्यरात्री पाऊणे बारा वाजण्याच्या सुमारास ट्रॅव्हल्स बस वाखारी गावच्या हद्दीतील ‘समाधान हॉटेल’ येथे जेवणासाठी थांबली.

बसमधील बहुतांश प्रवासी जेवणासाठी खाली उतरले. सुरुवातीला फिर्यादींची पत्नी मीरा, मुलगा आणि बहीण बसमध्येच होते. मात्र, काही वेळाने मुलगा अद्वैत झोपी गेल्याने, मीरा आणि त्यांची बहीण यशोदा या दोघी काही मिनिटांसाठी लघुशंकेसाठी बसमधून खाली उतरल्या आणि त्यानंतर चहा पिण्यासाठी गेल्या.

चहाचे पैसे देण्यासाठी मीरा या पुन्हा बसमध्ये आल्या आणि त्यांनी डिक्कीवजा जागेतून नारंगी रंगाची मोठी पर्स बाहेर काढली. मात्र, त्यातील सर्व रोकड आणि दागिने गायब झाले होते. त्यांनी तात्काळ बस चालक आणि क्लिनरच्या मदतीने संपूर्ण बस कडक चेक केली, मात्र चोरट्याने मधल्या काही मिनिटांतच डल्ला मारला होता.

दरम्यान, अज्ञात भामट्याने पर्समधून ५ ग्रॅम वजनाच्या 3 सोन्याच्या अंगठ्या, 1 तोळा वजनाची सोन्याची चैन, अडीच तोळे वजनाचा गळ्यातील सोन्याचा गोप, 8 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले, 4 तोळे वजनाचे सोन्याचे पारंपरिक गंठण, अडीच भार वजनाचे चांदीचे जोडवे, व रोख रक्कम 20 हजार रुपये असा मुद्देमाळ दिसून आला नाही. याप्रकरणी दयानंद सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून यवत पोलीस ठाण्यात अंड्यात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! जून महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता ‘या’ तारखेला होणार जमा

Wednesday, 24 June 2026, 13:32

पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी; ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना’ अंतर्गत 1 दिवसीय कुक्कुटपालन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन..

Wednesday, 24 June 2026, 13:14

स्वस्त सोन्याच्या नादात लाखो गमावले; हडपसरमधील महिलेची फसवणूक

Wednesday, 24 June 2026, 12:09

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हॉटेलच्या बाहेर उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्स बसमधून 10 तोळे सोन्याचे दागिने व रोख लंपास ; यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Wednesday, 24 June 2026, 12:06

पुण्याच्या नवले पुलाखाली सुरू होते ‘हे’ अवैध धंदे, पुणे पोलिसांचा मोठा दणका; गुन्हेगारांचे धाबे दणाणले

Wednesday, 24 June 2026, 11:50

दौंड नगरपरिषदेत गोंधळ; महिला अधिकाऱ्याला अश्लील शिवीगाळ, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ‘गब्बर वाल्मीकी’वर गुन्हा दाखल

Wednesday, 24 June 2026, 11:25
Next Post

स्वस्त सोन्याच्या नादात लाखो गमावले; हडपसरमधील महिलेची फसवणूक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.