पुणे : जागतिक बाजारातील घडामोडी आणि वाढत्या मागणीमुळे भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरांचा उच्चांक कायम आहे. गेल्या आठवड्यात किमतीत काही प्रमाणात घसरण झाली होती; मात्र या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. आज आठवड्याच्या तिसऱ्या दिवशीही सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 1,46,510 रुपयांवर पोहोचला आहे.

सतत होणाऱ्या या दरवाढीमुळे सामान्य खरेदीदारांच्या खिशावर मोठा ताण येत आहे.विविध कॅरेटनुसार सोन्याचे आजचे ताजे दर जाणून घ्या.

24 कॅरेट सोने: आज प्रति ग्रॅम 229 रुपयांची वाढ होऊन दर 14, 651 रुपये झाला आहे. त्यानुसार 10 ग्रॅम (प्रति तोळा) सोन्याचा भाव 2,290 रुपयांनी वाढून 1,46,510 रुपये, तर 100 ग्रॅम सोन्याची किंमत 22,900 रुपयांनी वाढून 14,65,100 रुपये झाली आहे.
22 कॅरेट सोने (दागिन्यांचे सोने): 22 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा 2100 रुपयांची वाढ झाली असून, नवा भाव 1,34,300 रुपये झाला आहे.
18 कॅरेट सोने: 18 कॅरेट सोन्याचा प्रति तोळा दर 1720 रुपयांनी वाढून 1,09,880 रुपयांवर गेला आहे. तसेच 100 ग्रॅम सोन्याचा भाव आता 10,98,800रुपये झाला आहे.
चांदीचा दरही वाढला असून 2,16,000 ते ,2,35,000प्रति किलोच्या उच्चाकी पातळीवर पोहचला आहे. सोन्याप्रमाणे चांदीची चमकही सातत्याने वाढत आहे.






