न्हावरे: रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष संतोष तुकाराम रणदिवे (वय 47) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने शिरूर तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

संतोष रणदिवे हे शिरूर तालुक्यासह तालुक्याच्या पूर्व भागात युवकांमध्ये लोकप्रिय होते.रणदिवे यांनी घोडगंगा साखर कारखान्याच्या उपाध्यक्ष पदाच्या कार्यकाळ यशस्वीरीत्या पूर्ण केला होता. तसेच त्यांनी शिरूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनही काम केले.
संतोष रणदिवे यांच्या पश्चात आई, वडील,पत्नी,दोन मुली,भाऊ,दोन बहिणी,भावजय आणि पुतणे असा मोठा परिवार आहे.संतोष रणदिवे हे घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक आणि रांजणगाव सांडसचे माजी सरपंच झुंबरआण्णा (तुकाराम) रणदिवे यांचे पुत्र तर विद्यमान सरपंच प्रदिपा संभाजी रणदिवे यांचे दीर होत.
हेही वाचा- नव्या समीकरणाचा आरंभ? भाजपला शह देण्यासाठी काका-पुतण्याची एकजूट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधान..
संतोष रणदिवे यांच्या निधनाने रांजणगाव सांडस,शिरूर तालुका मित्रपरिवार आणि रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना परिवारात शोककळा पसरली आहे.






