Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नव्या समीकरणाचा आरंभ? भाजपला शह देण्यासाठी काका-पुतण्याची एकजूट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधान..

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 12 November 2025, 14:14

पिंपरी-चिंचवड: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Pimpri-Chinchwad Politics) आगामी निवडणुकांची तयारी सुरू झाली असून, या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुण्यातही निवडणुकीसाठी पक्षाचा उत्साह पाहायला मिळत आहे.  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची (PCMC) सत्ता प्राप्त करण्यासाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान, सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) दोन्ही प्रमुख गट अजित पवार गट आणि शरद पवार गट हे स्थानिक पातळीवर एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

स्थानिक पातळीवर मोठ्या घडामोडी घडत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट भाजपला शह देण्यासाठी एकत्र येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या संभाव्य युतीमुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे की, शरद पवार गटाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आघाडीसाठी प्रस्ताव आला आहे.

अलीकडेच महायुतीमधील मंत्री आणि अजित पवार गटाचे अनुभवी नेते हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने कोल्हापुरात शहर विकास आघाडी स्थापन करण्याची घोषणा केली होती. या घडामोडीनंतर आता हाच पॅटर्न पिंपरी-चिंचवडच्या आगामी स्थानिक निवडणुकांमध्येही लागू होण्याची शक्यता बळावली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्थानिक पातळीवर आघाडी करण्यासंबंधीचे अधिकार स्थानिक नेतृत्वाकडे सोपवले असल्याची माहिती समोर आली असून अजित पवार यांनीही अनेक अधिकार स्थानिक नेतृत्वाकडे सोपवले आहेत. यामुळे अनेक समीकरण बदलण्याची शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील भाजपची (BJP) एकहाती सत्ता उलथवून टाकण्यासाठी विरोधीपक्ष चांगलीच मेहनत करतांना दिसून येत आहे. शरद पवार आणि अजित पवार गटाचे स्थानिक नेतृत्त्व निर्णायक भूमिका घेणार असल्याने, हा ‘कोल्हापूर पॅटर्न’ पिंपरीत यशस्वी झाल्यास, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठे राजकीय समीकरण बदलण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, या संभाव्य युतीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणे जुळवण्याची प्रक्रिया अतिशय वेगवान झाली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

बारामतीत चॉकलेटचे आमिष दाखवून दहा वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Tuesday, 7 April 2026, 16:59

पुण्यात बंटी-बबलीचा कारनामा! मावळमध्ये नवरा-बायकोने व्यावसायिकाला घातला लाखोंचा गंडा; 26 लाख घेऊन दोघंही पसार

Tuesday, 7 April 2026, 16:54

लोणी काळभोर येथे कारने दिलेल्या धडकेत आजीचा जागीच मृत्यू

Tuesday, 7 April 2026, 16:50

लोणी काळभोरमध्ये रॅपिडो चालकावर हल्ला! भाड्याच्या वादातून दगडांनी बेदम मारहाण; जखमीवर आयसीयूमध्ये उपचार सुरु

Tuesday, 7 April 2026, 16:41

मुंबईत व्यापाऱ्याला 17.5 कोटींचा चुना! पुण्यातील जमिनीच्या नावाने घातला गंडा; बाप-लेकाचा काळा कारनामा उघड

Tuesday, 7 April 2026, 16:19

बारा महिने सर्दी? याकडे दुर्लक्ष करू नका; असू शकतो ‘हा’ गंभीर आजार!

Tuesday, 7 April 2026, 16:10
Next Post
pune leopard terror : "If a violent leopard comes in front of people..."; Forest Minister Naik's strict instructions

pune leopard terror : "हिंसक बिबट्या लोकांसमोर आला, तर..."; वनमंत्री नाईकांचे कठोर निर्देश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.