Sunday, November 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे -सोलापूर महामार्गावर व्हेन्यू कारच्या धडकेत आयशर टेम्पो उलटला; नऊ जण जखमी

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 15 November 2026, 12:24

मांजरी : तुळजापूर येथे देवदर्शनासाठी नातेवाईकांसह निघालेल्या आयशर टेम्पोला मद्यधुंद अवस्थेतील व्हेन्यू कारचालकाने जोरदार धडक दिल्याने टेम्पो रस्त्यावर उलटला. या भीषण अपघातात महिला, पुरुष आणि लहान मुलांसह नऊ जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी (ता. 12) रात्री दहाच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावर शेवाळवाडी येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राजवळ घडली. मांजरी पोलीस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल नवसाजी पवार (रा. कदमवाकवस्ती, लोणी काळभोर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर या अपघातात मिना मारुती धोट (वय 30 ), नंदिनी दिलीप लोहार (वय 16), सुनिता रमेश कळसे (वय 50, रा.सर्व काळेपडळ हडपसर पुणे), दिलीप मोतीलाल लोहार (वय 42), आशा दिलीप लोहार (वय 31), रुपेश दिलीप लोहार (वय 12), वैष्णवी मारुती धोट आणि दोन पुरुष व एक महिला जखमी झाली आहे. याप्रकरणी गणेश विलास खळदकर (वय 45, रा. हांडेवाडी, पुणे) यांनी मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश खळदकर हे आपल्या नातेवाईकांसह मिनी आयशर टेम्पोतून तुळजापूरला देवदर्शनासाठी निघाले होते. टेम्पोत एकूण 18 जण प्रवास करत होते. शेवाळवाडी परिसरात पोहोचले असताना पाठीमागून आलेल्या काळ्या रंगाच्या व्हेन्यू कारने डाव्या बाजूने ओव्हरटेक करत टेम्पोला जोरदार कट मारला. यावेळी कारची टेम्पोला धडक बसली. कारला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने जोरात ब्रेक लावल्याने टेम्पोवरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो दुभाजकावर चढून रस्त्याच्या डाव्या बाजूला उलटला. या अपघातात पाच महिला, दोन पुरुष आणि दोन मुले जखमी झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. जखमींना शिवम हॉस्पिटल, विश्वराज हॉस्पिटल आणि लोटस हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेल्या व्हेन्यू कारचालकाचे डोळे लाल होते, बोलताना तो अडखळत होता तसेच त्याच्या तोंडातून दारूचा उग्र वास येत होता, असा आरोप फिर्यादीने केला आहे. अपघातानंतर संबंधित चालक जखमींना मदत न करताच घटनास्थळावरून पळून गेला. मात्र, कारमध्ये मिळालेल्या वाहन परवाना आणि कंपनीच्या ओळखपत्रावरून चालकाची ओळख राहुल पवार अशी समोर आली.

या अपघातात आयशर टेम्पोचे एक लाख रुपयांहून अधिक नुकसान झाले असून, समोरील काच, केबिन, आरसे आणि मागील बॉडीचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी गणेश खळदकर यांनी मांजरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, संबंधित कारचालकाविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे पोलीस दलात खळबळ! ३० लाखांच्या जबरी चोरीप्रकरणी आणखी एका पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कुऱ्हाड

Sunday, 15 November 2026, 17:29

सोरतापवाडी येथे दिवाळीसाठी मावशीकडे आलेल्या 15 वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू; वाघोली अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला

Sunday, 15 November 2026, 16:30

नाव आणि फोटोचा गैरवापर केल्यास कठोर कारवाई; रुपाली चाकणकर यांचा स्पष्ट इशारा!

Sunday, 15 November 2026, 16:29

पंढरपुरात भयंकर दुर्घटना! ३० फूट खोल विहिरीचे काम सुरू असताना कोसळला दगड-मातीचा ढिगारा; चार कामगार अडकल्याची भीती

Sunday, 15 November 2026, 16:09

सोन्या-चांदीच्या दरात उलथापालथ! चांदी थेट 15 हजारांनी स्वस्त; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

Sunday, 15 November 2026, 15:55

टीम इंडियाचा न्यूझीलंडवर २२ धावांनी विजय; पाच सामन्यांची वनडे मालिका ३-१ ने जिंकली

Sunday, 15 November 2026, 15:42
Next Post

पुणे-सोलापूर महामार्गावरील प्रयागधाम फाट्यासमोर चार वाहनांचा अपघात ; वेरनाच्या अचानक ब्रेकमुळे बोलेरो, मालवाहू टेम्पो आणि हायरायडर एकमेकांवर आदळले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp