Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इंदापुरात जमिनीच्या विक्रीवरून वाद पेटला; वृद्ध आई-वडिलांना मुलांकडून दांडक्याने मारहाण

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 1 September 2026, 13:58

इंदापूर : आईच्या नावावरील जमीन विकल्याच्या कारणावरून वाद झाल्यानंतर दोन मुलांनी वृद्ध आई-वडिलांना लाकडी दांडक्याने मारहाण करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना तरंगवाडी (ता. इंदापूर) येथे 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. या मारहाणीत वृद्ध दाम्पत्य जखमी झाले असून, त्यांच्यावर इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी तुकाराम किसन राऊत (वय 65, रा. सरस्वतीनगर, इंदापूर) यांनी पोलिसांना जबाब दिला आहे. त्यानुसार त्यांचे मुलगे संजय तुकाराम राऊत व राजेंद्र तुकाराम राऊत (दोघे रा. माळवाडी नं. 2, ता. इंदापूर) यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुकाराम राऊत हे आजारी पत्नी अंजना यांच्यासोबत तरंगवाडी येथील सलीम लॉन्सजवळील रस्त्यावर फिरत होते. त्यावेळी दोन्ही मुलगे कारमधून तेथे आले. “आईच्या नावावरील जमीन का विकली?” असा जाब विचारत त्यांनी लाकडी दांडक्यांनी आई-वडिलांना मारहाण केली. या मारहाणीत तुकाराम राऊत यांच्या पाठीत, तोंडावर, दोन्ही मांडीवर व डाव्या खांद्यावर दुखापत झाली. तर पत्नी अंजना यांच्या उजव्या मनगटाजवळ व कमरेला मार लागला.

दरम्यान, मुलांनी “विकलेली जमीन परत घ्या, नाहीतर तुम्हाला आमचा हिसका दाखवतो,” अशी धमकी देत शिवीगाळ व दमदाटी केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. मारहाणीचा आवाज ऐकून नागरिक जमा झाले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी वृद्ध दाम्पत्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. जमिनीच्या व्यवहारावरून सुरू झालेल्या कौटुंबिक वादाला हिंसक वळण मिळाल्याने परिसरात चर्चा रंगली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Gold-Silver Rate: मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे भाव गडगडले! सोन्या-चांदीच्या दारात मोठी घसरण; चांदी ५ हजारांनी स्वस्त तर सोनं….

Tuesday, 1 September 2026, 14:38

दौंडमध्ये लव्ह जिहाद! बोरिऐंदीतील हिंदू तरुणीचे घरात घुसून अपहरण; 4 जणांवर गुन्हा दाखल

Tuesday, 1 September 2026, 14:14

पळसदेवमध्ये जुन्या प्रेमसंबंधातून वादाला हिंसक वळण; महिलेला काठीने मारहाण , तिघांवर गुन्हा दाखल

Tuesday, 1 September 2026, 14:09

इंदापुरात जमिनीच्या विक्रीवरून वाद पेटला; वृद्ध आई-वडिलांना मुलांकडून दांडक्याने मारहाण

Tuesday, 1 September 2026, 13:58

मुलींच्या भविष्यासाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट 1.01 लाखांची मदत, ‘या’ कुटुंबांनाच मिळणार योजनेचा लाभ

Tuesday, 1 September 2026, 13:38

पोलिसांची ‘ती’ एक चूक महागात पडली! WhatsApp मेसेजवरून अटक कळवली, कोर्टाने आरोपीला सोडलं

Tuesday, 1 September 2026, 13:06
Next Post

पळसदेवमध्ये जुन्या प्रेमसंबंधातून वादाला हिंसक वळण; महिलेला काठीने मारहाण , तिघांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp