Saturday, May 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे ग्रामीण पोलीस दलातील ७ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 1 May 2026, 18:43

लोणी काळभोर, ता.1:  पोलीस खात्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राज्यातील ८०० आधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहेत.  राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी या संदर्भातील आदेश जारी केला आहे.  आज १मे रोजी महाराष्ट्र दिनी या आधिकारी व कर्मचाऱ्यांना हे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे.

 

पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक विनोद भोकरे, महेश बनकर, सुहास पवार, राजेंद्र कोंकेरी, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप भावसार, सहायक पोलीस उपनिरीक्षक दिपाली चासकर (कहडणे), व राहुल पवार यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले आहे.

पोलीस उपनिरीक्षक विनोद शामराव भोकरे पुणे ग्रामीण पोलीस दलात सन १९९५ मध्ये पोलीस शिपाई म्हणून भरती झाले. त्यानंतर लोणी काळभोर, ओतूर पोलीस ठाणे, महामार्ग पोलीस पथक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व सध्या स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण अशी एकूण ३१ वर्ष सेवा कालावधी पूर्ण झाला आहे, सदर सेवा कालावधीमध्ये चांगल्या कामगिरीबद्दल त्यांना एकूण १३१ बक्षीसं व प्रमाणपत्र प्राप्त झाली आहेत.

सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप मनोहर भावसार हे सध्या नागरी हक्क संरक्षण, पुणे पथकात आहेत. ते २००२ मध्ये पुणे ग्रामीण पोलीस दलामध्ये पोलीस शिपाई म्हणून भरती झाले आहेत. त्यांनी आपले मुलभूत प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण केल्यानंतर नारायणगाव, हवेली, लोणी काळभोर, वालचंदनगर पोलीस ठाणे, जिल्हा वाहतुक शाखा येथे कर्तव्य बजावले आहे. त्यांनी आता पर्यंत बजावलेल्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांना एकूण १४८ बक्षीसे मिळालेली आहेत. त्यांनी नारायणगाव पोलीस ठाणे, हवेली पोलीस ठाणे, लोणीकाळभोर पोलीस ठाणे, जिल्हा वाहतूक शाखा, नागरी संरक्षण पुणे पथक याठिकाणी नेमणुकीस असताना त्यांना संगणकाचे व तपास कामाचे चांगले ज्ञान असल्याने त्यांनी नमूद पोलीस ठाणे प्रभारी तपासी अधिकारी व प्रभारी अधिकारी यांचे दप्तरी म्हणून काम पाहिलेले आहे.

सहायक पोलीस उपनिरीक्षक दिपाली सुदर्शन चासकर (कहडणे) पुणे ग्रामीण पोलीस दलात २००२ मध्ये भरती झाल्या आहेत. जिल्हा विशेष शाखा, गुन्हे अन्वेषण शाखा, सीआयडी पुणे व सध्या जिल्हा वाहतूक शाखा येथे कामकाज करत आहेत. 

पुणे ग्रँड टुर सायकल स्पर्धेचे सर्व प्रकारचे पत्र व्यवहार, बैठकीची माहिती तसेच स्पर्धेसाठी लागणारे साहित्य वेळोवेळी त्यांनी उपलब्ध करून दिले होते. त्यांना एकुण ११२ बक्षिस मिळाली आहेत. अपर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी वेळोवेळी त्यांच्या कामाचं कौतुक केले आहे

गुन्हे अन्वेषण विभाग येथे महाराष्ट्राचा मासिक गुन्हे अहवाल तसेच सर्व प्रकारचे पत्रं, गृह विभाग यांची माहिती सर्व प्रकारच्या अधिवेशन माहिती तसेच गंभीर गुन्ह्यांच्या रेकॉर्डमध्ये वेगळी पद्धत त्यांनी चालू केली. जुलै २०२४ पासून भारतीय न्याय संहिते नुसार नवीन तक्ता बनवून सर्व घटकांकडून माहिती घेऊन एकत्रित करून अचूक अहवाल पोलीस महासंचालक व गृह विभाग मंत्रालय यांना सादर केला. माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालयात वेळोवेळी घेण्यात येणाऱ्या वरिष्ठ अधिकारी बैठकीत घटकांची माहिती अचूक सादर करून त्याचे प्रेझेंटेशन दिपाली चासकर यांनी दिले.

महेश जानकु बनकर हे सन २००१ मध्ये पुणे ग्रामीाण पोलीस दलामध्ये पोलीस शिपाई म्हणुन भरती झाले. बारामती शहर, इंदापुर, यवत पोलीस ठाण्यात त्यांनी काम केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेत ३ वर्षापासुन नेमणुकीस असुन मोक्का, एम पी डि ए, महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रस्तावांचे कामकाज पहात आहे. यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंगणीगाडा येथील दुहेरी खून प्रकरणाची संपुर्ण कागदपत्रे बनवुन त्यामध्ये आरोपीला जन्मठेपेची शिक्षा मिळाली आहे. सन २०१६ साली यवत (ता. दौड) येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेवर पडलेल्या दरोड्या मधील आरोपींविरुध्द मोक्का कायद्यांतर्गत प्रस्ताव तयार करून आरोपींना जन्मठेपेची शिक्षा होईपर्यत संपुर्ण कामकाज पाहिलेले आहे. आतापर्यंत त्यांनी एकुण १२५ बक्षीसे मिळाली आहेत.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भिगवणमध्ये किरकोळ वादातून सूड; दबा धरून ४६ वर्षीय व्यक्तीवर जीवघेणा हल्ला, विक्रम बाळासो माडगे व रूपाली माडगे अटकेत

Friday, 1 May 2026, 21:09

पुणे ग्रामीण पोलीस दलातील ७ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान

Friday, 1 May 2026, 18:43

यवत येथील चोरीचा गुन्हा 48 तासाच्या आत उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश 

Friday, 1 May 2026, 15:34

हवेलीत कारचा पाठलाग करून कुटुंबावर हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा

Friday, 1 May 2026, 12:10

सिंहगडावर सापडला बेपत्ता तरुणीचा मृतदेह ; रॅपलिंगच्या साहाय्याने खोल दरीतून काढला बाहेर

Friday, 1 May 2026, 11:56

Political News : ‘पवार विरुद्ध पवार’ निवडणूक यापुढे होऊ देणार नाही – सुप्रिया सुळे यांची मोठी घोषणा

Thursday, 30 April 2026, 18:43
Next Post

भिगवणमध्ये किरकोळ वादातून सूड; दबा धरून ४६ वर्षीय व्यक्तीवर जीवघेणा हल्ला, विक्रम बाळासो माडगे व रूपाली माडगे अटकेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.