Sunday, April 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime : परीक्षा देण्यासाठी आलेल्या बहिणीची छेड, जाब विचारणाऱ्या भावाचं डोकं फोडलं, परीक्षा केंद्रावर नेमकं काय घडलं?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 13 March 2026, 12:50
Crime

photo- ai

Crime : दहावीच्या परीक्षेसाठी आलेल्या एका विद्यार्थिनीच्या छेडछाडीच्या घटनेने वैजापुर तालुक्यातील खंडाला येथे मोठी खळबळ उडाली आहे. बहिणीची छेड काढणाऱ्यांना जाब विचारल्याच्या रागातून टवाळखोरांनी विद्यार्थिनीच्या भावावर थेट परीक्षा केंद्राजवळ जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 3 संशयित तरुणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी बाहेरगावाहून खंडाळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या परीक्षा केंद्रावर येत होती. मात्र गेल्या 3 दिवसांपासून काही स्थानिक तरुण तिचा पाठलाग करत छेडछाड करत होते. सततच्या त्रासामुळे विद्यार्थिनीने हा प्रकार आपल्या भावाला सांगितला.

घटनेच्या दिवशी सकाळी सुमारे 10 वाजता तिचा भाऊ तिला परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी आला. त्यावेळी त्याने संबंधित तरुणांना जाब विचारला. त्यानंतर विद्यार्थिनी परीक्षा देण्यासाठी वर्गात गेली; मात्र काही वेळातच बाहेर दबा धरून बसलेल्या टवाळखोरांनी तिच्या भावाला घेरले. अचानक झालेल्या या हल्ल्यात आरोपींनी खिशातून फायटर (धारदार हत्यार) काढून तरुणाच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेला तरुण रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.

घटनास्थळी उपस्थित काही नागरिकांनी तत्काळ धाव घेत हस्तक्षेप केल्याने मोठी अनर्थ टळला. जखमी तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या परीक्षा केंद्रावर यापूर्वीही तणावाचे वातावरण होते. 2 दिवसांपूर्वी काही टवाळखोरांनी केंद्रावर दगडफेक करून कर्मचाऱ्यांना धमकावल्याची घटना घडली होती. इतक्या गंभीर प्रकारानंतरही पुरेशी पोलीस बंदोबस्त व्यवस्था नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हल्ल्यानंतर सुमारे 30 मिनिटांनी पोलीस घटनास्थळी पोहोचल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला.

या घटनेमुळे परीक्षा केंद्रांवरील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सध्या पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेजच्या आधारे 3 संशयितांना ताब्यात घेतले असून या हल्ल्यामागे आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास सुरू आहे. शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण मिळावे, अशी मागणी पालक आणि ग्रामस्थांकडून होत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पिंपरीतील प्रकार! बायकोने मुलीच्या क्लासची फी मागितली म्हणून नवऱ्याने डोकं फुटेपर्यंत झोडपलं; पोलिसांत गुन्हा दाखल

Sunday, 12 April 2026, 20:21
Pune Metro

Pune : पुढील 4 वर्षांत खडकवासला-खराडी मेट्रो धावणार! लाईन 4 आणि 4 ए प्रकल्पाचा असा असेल नकाशा

Sunday, 12 April 2026, 20:08
Yewala

Yewala : लग्न लावून द्यायचे अन् 2 लाख उकळायचे, काही दिवसांतच नवरी व्हायची पसार; एजंटांचा धक्कादायक प्लॅन पाहून पोलीसही चक्रावले..

Sunday, 12 April 2026, 19:43

पिंपरीत गाईडच्या लैंगिक छळाला कंटाळून पीएचडी विद्यार्थिनीची आत्महत्या; भोसरी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल

Sunday, 12 April 2026, 19:35
"Dada passed away while serving..." Sunetra Pawar's "emotional" speech in Baramati; Tributes paid at Ajitdada's memorial site

‘”सेवा करता करता दादा गेले…” बारामतीत सुनेत्रा पवारांची “भावनिक” साद; अजितदादांच्या स्मृतिस्थळावर वाहिली श्रद्धांजली

Sunday, 12 April 2026, 18:44
crime

crime : आधी फोन करून बोलावले, मग वडिलांसमोरच गाडीत कोंबले! पैशांच्या वादातून थरार..अपहरण प्रकरणाचा पोलिसांनी लावला छडा

Sunday, 12 April 2026, 18:19
Next Post

Karad Accident News: आंबेनाली घाटात भीषण अपघात; वॅगनआर कार 300 ते 400 फूट दरीत कोसळली, पाच जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.