Saturday, May 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

घरी कोणी नसताना बॉयफ्रेंड प्रेयसीच्या घरात घुसला, भावाने रंगेहाथ पकडलं अन् केलं धक्कादायक कृत्य; नेमकं काय घडलं?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 1 November 2025, 16:15
Crime News: Shocking! Girlfriend called boyfriend home when no one was there; Brothers caught him red-handed, washed him and...

Photo-AI Generated

छत्तीसगड: छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील भिलाई (crime news) परिसरात प्रेमसंबंधातून एक धक्कादायक हत्या प्रकरण उघडकीस आले आहे. प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेलेल्या तरुणाची तिच्याच भावांनी निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, दोन आरोपी फरार आहेत आणि त्यांचा शोध सुरू आहे.

 

या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव धीरज सरोज उर्फ विक्की (वय 25 वर्षे) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरजचा त्याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होता. घटनेच्या दिवशी तरुणीची आई घराबाहेर गेली होती, तर तिचा भाऊ सूरज कामावर होता. या संधीचा फायदा घेत धीरज प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. तरुणीने त्याला येऊ नकोस असे सांगितले होते, तरीही तो तिच्या घरी गेला.

काही वेळाने सूरज अचानक घरी परतला आणि दोघांना एकत्र पाहून तो संतापला. त्याने तात्काळ आपल्या चुलत भावांना बोलावले आणि दरवाजा बंद करून धीरजला बेदम मारहाण केली. या मारहाणीदरम्यान धीरजच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

मृत तरुणाची आई शोभा सरोज यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, प्रेयसीनेच धीरजला घरी बोलावून घेतले होते आणि त्यानंतर तिच्या भावांनी मिळून त्याची हत्या केली. ती घटनास्थळी पोहोचली तेव्हा धीरज रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता, असेही त्यांनी सांगितले.

पोलीस अधिकारी हेम प्रकाश नायक यांनी सांगितले की, “धीरजची अत्यंत निर्दयपणे हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणातील पाच संशयितांची ओळख पटली असून, तिघांना अटक करण्यात आली आहे. दोन आरोपी फरार आहेत आणि त्यांचा शोध सुरू आहे. प्राथमिक तपासात हे स्पष्ट झाले आहे की, धीरज प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता आणि तेथेच तिच्या भावांनी व नातेवाईकांनी त्याच्यावर हल्ला करून त्याचा खून केला.” या घटनेनंतर स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Daund News : दौंड तालुक्यातील सर्व कामे वेळेत पूर्ण करा – आमदार राहुल कुल

Saturday, 2 May 2026, 15:40

Indapur News : इंदापुरात भरधाव कारने उभ्या असलेल्या तीन वाहनांना उडवले ; एका रिक्षासह दोन कारचे प्रचंड नुकसान, चालकाने कारसह ठोकली धूम..

Saturday, 2 May 2026, 15:33

Digital Census : डिजिटल जनगणनेत सहभागी व्हा, देशाच्या प्रगतीत हातभार लावा!

Saturday, 2 May 2026, 15:17

Loni Kalbhor News : लोणी काळभोरमध्ये ‘थार’चा थरार; अल्पवयीन चालकाकडून १७ दुचाकींची चक्काचूर, कार मालकावर गुन्हा

Saturday, 2 May 2026, 15:10
duaghter murdered her mother with help of friend pune

Pune Crime : दारूच्या वादातून मजुराचा दगडाने ठेचून खून, कोंढवा पोलिसांकडून आरोपी जेरबंद

Saturday, 2 May 2026, 13:53
two people detained for taking bribe in parbhnai

Akrudi Bribe : RTE प्रवेशासाठी ४० हजारांची लाच; एसीबीने खाजगी इसमाला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले!

Saturday, 2 May 2026, 12:52
Next Post
Daund Politics: Omkar Shelar appointed as Vice President of Nationalist Youth Congress

Daund Politics: दौंड राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी ओंकार शेलार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.