Wednesday, August 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जात जिंकली, प्रेम हरलं! घरच्यांच्या विरोधाला कंटाळून प्रेमीयुगुलाचं टोकाचं पाऊल; तलावात सापडले मृतदेह

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 19 August 2026, 18:43

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील गोकसावंगी येथील 24 वर्षीय तरुण आणि 21 वर्षांची तरुणी 14ऑगस्टपासून अचानक बेपत्ता झाले होते. नातेवाईकांनी मालेगाव पोलीस ठाण्यात ते हरवल्याची तक्रारही दाखल केली होती. मात्र, बुधवारी गावाजवळील मोर्णा तलावात मासेमारीसाठी गेलेल्या स्थानिक नागरिकांना या दोघांचे मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आले. या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या दोघाचही एकमेकांवर मनापासून प्रेम करत होते आणि त्यांना विवाहबंधनात अडकायचे होते. त्यांनी आपल्या कुटुंबाकडे लग्नाची इच्छा व्यक्त केली होती. परंतु, दोघेही वेगवेगळ्या जातींचे असल्याने दोन्ही बाजूंच्या पालकांचा या आंतरजातीय विवाहाला तीव्र विरोध होता. मुलांनी कुटुंबियांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पालक आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने दोघेही प्रचंड नैराश्यात गेले होते.

घरच्यांचा पाठिंबा न मिळाल्याने आणि समाजात एकत्र जगणे कठीण वाटू लागल्याने त्यांनी अखेर स्वतःचे जीवन संपवण्याचा मार्ग निवडला. 14 ऑगस्ट रोजी ते मोर्णा तलावाच्या परिसरात आले आणि त्यांनी पाण्यात उडी घेतली.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

मालेगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास करत असून, कुटुंबियांची व प्रत्यक्षदर्शींची चौकशी केली जात आहे. आजच्या आधुनिक काळातही आंतरजातीय प्रेमाला मिळणाऱ्या विरोधामुळे दोन तरुण जिवांना आपला प्राण गमवावा लागल्याने समाजातील या खोट्या प्रतिष्ठेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे रेल्वे स्थानकात मध्यरात्री तिकिट केंद्रातील कर्मचाऱ्यावर चाकूने वार; 4.91 लाखांचा मुद्देमाल लंपास..

Wednesday, 19 August 2026, 19:04

तुकाराम मुंढेंचा गुळ व्यापाऱ्यांना दणका! वसंतदादा मार्केट यार्डात धाड; ४ लाखांचा संशयास्पद गुळ जप्त

Wednesday, 19 August 2026, 18:51

जात जिंकली, प्रेम हरलं! घरच्यांच्या विरोधाला कंटाळून प्रेमीयुगुलाचं टोकाचं पाऊल; तलावात सापडले मृतदेह

Wednesday, 19 August 2026, 18:43

श्री संत सावता महाराज पालखी सोहळ्याचे इंदापुरात उत्साहात स्वागत

Wednesday, 19 August 2026, 18:40

शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतरही कर्जाचा बोजा नाही! वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 19 August 2026, 18:10

चिमुकलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाला अतिशहाणपणा भोवला! ‘बघा मी CCTV मध्ये दिसतोय म्हणाला अन् बिंग फुटलं

Wednesday, 19 August 2026, 18:07
Next Post

तुकाराम मुंढेंचा गुळ व्यापाऱ्यांना दणका! वसंतदादा मार्केट यार्डात धाड; ४ लाखांचा संशयास्पद गुळ जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.