Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तुकाराम मुंढेंचा गुळ व्यापाऱ्यांना दणका! वसंतदादा मार्केट यार्डात धाड; ४ लाखांचा संशयास्पद गुळ जप्त

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 19 August 2026, 18:51

सांगली: गुळामध्ये भेसळ होत असल्याच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने पुण्यातील वसंतदादा मार्केट यार्डात धडक कारवाई केली. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत ‘मितेश सेल्स कार्पोरेशन’ या गूळ व्यापार पेढीवर छापा टाकण्यात आला. तपासणीदरम्यान गूळ आणि गूळ पावडरच्या दर्जाबाबत संशय निर्माण झाल्याने सुमारे ४ लाख ३० हजार रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.

बाजारात विक्री होणाऱ्या गुळामध्ये साखरेचा अनधिकृत वापर तसेच आरोग्यास घातक ठरू शकणारी रसायने मिसळली जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर एफडीएच्या पथकाने अचानक तपासणी मोहीम हाती घेतली.

सहाय्यक आयुक्त रावसाहेब समुद्रे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संबंधित पेढीमध्ये दोन तासांहून अधिक काळ तपासणी केली. या पथकात अन्न सुरक्षा अधिकारी तुषार घुमरे यांच्यासह चार अधिकारी सहभागी होते. तपासणीदरम्यान गुळाच्या साठ्यावर आवश्यक लेबलिंग नसल्याचे आढळून आले. त्याचबरोबर गूळ पावडर आणि गुळाच्या ढेपांच्या गुणवत्तेबाबतही शंका निर्माण झाली. त्यामुळे संपूर्ण संशयास्पद साठा ताब्यात घेण्यात आला.

कारवाईदरम्यान गुळाचे नमुने घेऊन ते रासायनिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर संबंधित मालामध्ये भेसळ किंवा गुणवत्तेचे नियमभंग आढळल्यास अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

गुळातील भेसळ आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी एफडीएकडून तपासण्या अधिक कडक करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. संशयास्पद अन्नपदार्थ आढळल्यास त्याची तपासणी करून कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

 

दरम्यान, अन्नपदार्थ किंवा औषधांच्या गुणवत्तेबाबत नागरिकांना काही संशय असल्यास प्रशासनाकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तक्रार करताना संबंधित आस्थापनेचा अचूक पत्ता आणि संशयित अन्नपदार्थाची माहिती देणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘माझा मुलगाही त्या सहलीला गेला’ आळंदी पोलीस ठाण्यात बैठकीतच मृत्यूची यादी समोर आली; सर्व पोलिसांचे डोळे पाणावले, काळजाचा ठोका चुकवणारा क्षण

Saturday, 3 October 2026, 15:24

‘गे डेटिंग’ ॲपवर ओळख; पुण्यातल्या तरुणाला निर्जनस्थळी भेटायला बोलावलं अन् पडक्या खोलीत नेत तिघांचं भयानक कृत्य…

Saturday, 3 October 2026, 15:18

मिनाक्षी शिंदेंच्या अडचणी वाढल्या! पूर्णेकर हत्याकांडात चौकशीची टांगती तलवार; मोठी अपडेट समोर

Saturday, 3 October 2026, 15:03

IND vs PAK Asian Games 2026 Final: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम! फायनलमध्ये पाकिस्तानला १९ धावांनी धुडकावत टीम इंडियाने पटकावले सुवर्णपदक

Saturday, 3 October 2026, 14:58

सरकारचा शब्द कागदावरच; संगणक परिचालकांचे मानधन पुन्हा रखडले!

Saturday, 3 October 2026, 14:41

पुणे शिक्षक मतदारसंघाचा तिढा सुटला! महायुतीकडून भाजपने मारली बाजी; कौस्तुभ गावडे उमेदवारीच्या रिंगणात

Saturday, 3 October 2026, 14:41
Next Post

पुणे रेल्वे स्थानकात मध्यरात्री तिकिट केंद्रातील कर्मचाऱ्यावर चाकूने वार; 4.91 लाखांचा मुद्देमाल लंपास..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp