उरुळी कांचन, (पुणे) : पुणे-सोलापुर महामार्गावर सर्वात मोठ्या व व्यापारीदृष्ट्रया संवेदनशिल समजल्या जाणाऱ्या उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मयूर पोपट कांचन यांची बुधवारी (ता. 14) बिनविरोध निवड करण्यात आली.

अमित उर्फ (बाबा) भाऊसाहेब कांचन यांनी आपल्या ठरलेल्या वेळेत राजीनामा दिल्याने हि निवडणूक घेण्यात आली. उरुळी कांचनच्या मंडल अधिकारी नूरजहाँ सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. सरपंच पदासाठी मयूर कांचन व ऋतुजा कांचन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. ठरलेल्या वेळेत ऋतुजा कांचन यांनी अर्ज माघारी घेतला. सरपंच पदासाठी मयूर कांचन यांचा एकमेव अर्ज आल्याने नूरजहाँ सय्यद यांनी सरपंचपदी मयूर कांचन यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. ग्रामविकास अधिकारी प्रकाश गळवे व तलाठी सुधीर जायभाय यांनी निवडणुकीचे कामकाज पहिले.
यावेळी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष आबासाहेब कांचन, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अलंकार कांचन, क्षेत्रीय रेल्वे समितीचे सदस्य अजिंक्य कांचन, मावळते सरपंच अमित (बाबा) कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, राजेंद्र कांचन, उपसरपंच सीमा कांचन, माजी उपसरपंच संचिता कांचन, अनिता तुपे, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद जगताप, सुनिल तांबे, शंकर बडेकर, प्रियांका कांचन, स्वप्नीशा कांचन, उद्योजक सागर कांचन, जानाई डेव्हलपर्सचे संदीप गव्हाणे, माजी उपसरपंच युवराज कांचन, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

निवडीनंतर ”पुणे प्राईम न्यूज”शी बोलताना नवनिर्वाचित सरपंच मयूर कांचन म्हणाले कि, “उरुळी कांचन गावच्या विकासासाठी गट-तट बाजूला ठेवून गावच्या विकासावर लक्ष केंद्रित करणार आहे. उरुळी कांचन गावासाठी राहिलेल्या उर्वरित कामासाठी वाढीव निधी मंजूर करून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच उरुळी कांचनसह परिसरातील मान्यवरांसह सर्व सदस्यांना बरोबर घेऊन राहिलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच सरकारी दवाखान्याचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी तत्पर असणार आहे.







