Wednesday, June 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विधानपरिषदेसाठी भाजपला 12 जागा तर शिंदे-अजित पवार यांच्या पक्षाला मिळाल्या ‘एवढ्याच’ जागा

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 22 May 2026, 16:16

मुंबई: महाराष्ट्रातील आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर समोर आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ही निवडणूक एकत्र लढणार असून नेत्यांमध्ये यावर एकमत झाले आहे. या फॉर्म्युल्यानुसार भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांच्या संख्याबळावर ही प्राथमिक चर्चा झाली आहे. ज्या पक्षाचे सदस्य जास्त, त्या पक्षाचा त्या जागेवर दावा, असे सूत्र ठरले आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या अंतिम बैठकीत यावर अधिकृत निर्णय घेणार आहेत.

 

कोणता पक्ष कोणत्या जागा लढवणार?

    • भारतीय जनता पक्षाचा (BJP) १२ जागांवर दावा: विदर्भातील नागपूर, अमरावती, भंडारा-गोंदिया आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या जागा भाजपच्या वाट्याला जाऊ शकतात. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर आणि सातारा-सांगली या भागांवरही भाजप दावा करणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, मराठवाड्यातील नांदेड, लातूर-धाराशीव-बीड, छत्रपती संभाजीनगर-जालना आणि अहमदनगर (अहिल्यानगर) या मतदारसंघांतूनही भाजप आपले उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचे दिसते.

    • शिवसेनेचा (शिंदे गट) ३ जागांवर जोर: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे प्रामुख्याने मुंबईच्या जवळचा ठाणे जिल्हा तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि विदर्भातील यवतमाळ या ३ महत्त्वाच्या जागा राहण्याची शक्यता आहे.

    • राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) २ जागांवर लक्ष: अजित पवारच्या राष्ट्रवादीकडे कोकणातील रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा मोठा मतदारसंघ आणि मराठवाड्यातील हिंगोली-परभणी ही जागा जाण्याची दाट चिन्हे आहेत.

विधानपरिषदेच्या एकूण 17 जागांसाठी 25 मे रोजी अधिसूचना निघणार आहे. इच्छुकांना 1 जूनपर्यंत अर्ज भरता येतील, तर 4 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील. यानंतर 18 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल आणि 22 जून रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल.

सध्याचे राजकीय गणित पाहता या निवडणुकीत महायुतीचे पारडे जड मानले जात आहे. काही जागांवर अदलाबदल देखील होऊ शकते. या जागावाटपामुळे आता राज्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Daily horoscope: आजचा दिवस कोणासाठी ठरणार लकी? वाचा 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Wednesday, 10 June 2026, 9:37

नवले पुलाचा ‘मृत्यूचा सापळा’ कायम; मिक्सरखाली चिरडून तरुणाचा जागीच अंत

Wednesday, 10 June 2026, 9:26

ऊर्जा युद्धावर भारताचा मास्टरस्ट्रोक! 40 हजार कोटींची गॅस पाइपलाइन; थेट ओमानमधून मिळणार गॅस

Tuesday, 9 June 2026, 22:59

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली ‘गलिच्छ’ धंदा! हिंजवडीतील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; दोन महिलांची सुटका

Tuesday, 9 June 2026, 22:28

मराठी अभिनेत्री पूजा सावंतच्या गाडीचा भीषण अपघात! पुण्याहून सांगलीला जाताना तीन गाड्यांची धडक

Tuesday, 9 June 2026, 21:46

विमाननगरमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट; प्रतिबंधित हुक्का फ्लेवर्स व ई-सिगारेट विक्रीप्रकरणी एकाला अटक

Tuesday, 9 June 2026, 21:08
Next Post

आई-वडील दोघेही IAS असतील तर मुलांना आरक्षणाची गरजच काय? सर्वोच्च न्यायालयाचा थेट अन् संतप्त सवाल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.